Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मगर किती हुशार प्राणी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशाच एक मगरीने शिकार पकडण्यासाठी चक्क मेल्याचं नाटक केलं. हे पाहून काही लोक तिच्याजवळ गेले खरे पण त्यांना हे धाडस चांगलंच महागात पडलंय. या व्हिडीओचा शेवट पाहून तुमचाही थरकाप उडेल. मगरीनं केलेला हल्ला पाहून खरंच अंगावर काटा येतो.

How to clean Cooler at home
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!
The Union Public Service Commission CAPF registration begins apply for 506 Assistant Commandant posts
UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
Rava Papad With Pali in Just One Cup Semolina Summer Marathi Recipes
१ वाटी रव्याचे चौपट फुलणारे पळी पापड बनवूया; तळताना तेलही शोषून घेणार नाही, पाहा सोपा Video

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगर एका कडेला शांत पडलेली दिसत आहे. बऱ्याच वेळ मगरीनं हालचाल न केल्यानं तिथे उपस्थित लोकांना वाटतं ती मेली आहे. त्यामुळे मगरीसोबत फोटो काढण्यासाठी एक एक करत ४ जण तिच्या आजूबाजूला उभे राहतात. यावेळी एक जण त्या सगळ्यांचे फोटो काढत आहे. बराच वेळ शांत असलेल्या मगरीनं संधी मिळताच एक महिलेवर जोरदार हल्ला केला. यावेळी सगळ्यांचीच भीतीने गाळण उडते. सर्वजण सैरावैरा पळू लागतात. मगरीचा हल्ला भीषण असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! माशाने मुलीला समुद्रात खेचलं; चिमुकली गेली थेट तळाला, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

काही लोकांनी या व्यक्तीचं हे पाऊल अत्यंत धोकादायक ठरवले असून तज्ञांच्या मदतीशिवाय मगरीला उचलणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.