Viral Video: या जगात अनेक विषारी प्राणी आहेत. त्यातील काही खूप दुर्मीळ असून, ज्यांना आपण कधी पाहिलेलंही नाही. पण, याच विषारी आणि भयानक प्राण्यांच्या यादीत सापाचाही समावेश आहे. साप म्हटलं की, नेहमीच अनेकांच्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियामुळे सतत विविध प्राण्यांची माहिती, व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अनेक सर्पमित्र सापाला पकडतानाचे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत असतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात लहान मुलगी सापाला मिठी मारून बसलेली दिसत आहे.

अनेकदा सोशल मीडियावर सर्पमित्रांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यात कधी काही सर्पमित्र सापाला गळ्यात घेऊन फिरतात; तर कधी सापासोबत खेळताना दिसतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक साप एका मुलीला मिठी मारून बसलेला दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडीओतील लहान मुलगी पलंगावर झोपली असून, मोबाईलमध्ये काहीतरी पाहताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक भलामोठा साप तिला मिठी मारून बसलेला दिसत आहे. यावेळी ती मुलगी त्या सापाचे चुंबनदेखील घेत आहे. हा थरराक व्हिडीओ पाहून सापाला घाबरणाऱ्यांच्या अंगावर सहजपणे काटा येईल.

हेही वाचा: भरमंडपात फवारला धूर, पाहुणे गेले पळून; Viral Video पाहून हसाल पोट धरून

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @snakemasterexotics या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या अकाउन्टवर या मुलीचे विविध भयानक सापांसोबतचे तसेच विविध प्राण्यांसोबतचे अनेक व्हिडीओ आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत ६९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सहा लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत यातील एका युजरने लिहिलंय की, बापरे, “कदाचित तो साप तिला भविष्यात खाऊ शकतो, काळजी घ्या”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हिचे आई-वडिल वेडे आहेत का?”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मला हा व्हिडीओ पाहून खूप भीती वाटतेय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “घाबरु नका ही इच्छा धारी नागिण आहे.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिचे आई-वडिल खूप मूर्ख आहेत.”