आश्चर्यकारक आणि धाडसी व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. आता या महिलेची हिम्मत बघा. या महिलेला हजारो फूट उंचीवर हवेत उडताना बर्गर खाण्याचा छंद जडला आहे. या धाडसी महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. स्कायडाव्हिंग म्हटलं की भीतीने अंगाचा थरकाप उडतो. इतक्या उंचावर जाण्यासाठी धाडसही लागतं. स्कायडायव्हिंग करताना मजा वाटत असली तरी जेव्हा उडी मारायची वेळ येते तेव्हा भयंकर भीती वाटते. असं असताना ही महिला स्कायडायव्हिंग करताना अगदी आरामात बर्गर खाताना पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कायडायव्हिंग करणारी ही महिला घाबरलेली नसून मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ती आकाशात उडताना चक्क हातात असलेला बर्गर खाताना दिसतेय. ही मुलगी १० हजार फूट उंच वर आकाशात गेली. पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही. तिच्या हातात असलेलं एक पाकीट ती उघडताना दिसते. या पाकीटातलं बर्गर काढून मुठीत घट्ट पकडून बर्गर तोंडात कोंबताना दिसतेय. त्यामूळ ही तरूणी खाण्याची नक्की शौकीन असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामूळे ती १० हजार फूट उंचीवर जाऊन आपल्या आवडीचा पदार्थ स्काय डायव्हिंग करताना खातेय.
आणखी वाचा : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण हत्तीला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना भावूक झाला हा चिमुकला, पाहा VIRAL VIDEO
मॅकेन्ना असं या तरूणीचं नाव आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते. हा व्हिडीओ तिने तिच्या McKenna Knipe या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.