सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. अनेक व्हिडीओ पहिले जातात आणि शेअर केले जातात. यातील बरेच व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ खूप भयावह असतात. पण काही व्हिडीओना युजर्स खूप लाईक करतात, पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या व्हिडीओमध्ये आगळ्यावेगळ्या रंगाची इडली दिसतेय. अशी इडली तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.
इडली हा खाद्य प्रकार अतिशय निराळा आणि भन्नाट आहे. आख्या देशभर विचारत सुटलात तरी एक ही माणूस असा सापडणार नाही ज्याला इडली आवडणार नाही. का म्हणून काय विचारताय इडली आहेच अशी सगळ्यांची आवडती. आतापर्यंत तुम्ही पांढरी इडली पाहिली असेल. पण निळ्या रंगाची इडची तुम्ही कधी पाहिलीय का? होय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क निळ्या रंगाची इडली दिसतेय. त्यामुळे खाद्यप्रकारांमध्ये होत असलेल्या या नव्या प्रयोगाने इडली प्रेमींना आश्चर्याचा धक्का दिलाय.
फूड कलर्स अधिक आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये अनेकदा जोडले जातात. बटरफ्या पी या झाडांच्या फुलांचा वापर करून एका महिलेने चक्क निळ्या रंगाच्या इडल्या बनवल्या आहेत. हा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून एकच इडली प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काहींनी त्यांना इडलीचा रंग किती आवडतो हे शेअर केले, तर काहीजण पदार्थाच्या चवीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
jyotiz_kitchen नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “ब्लू पी इडली,” असं कॅप्शन लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधल्या महिलेने काही बटरफ्लाय पी झाडांची फुले तोडून उकळून घेते. नंतर ते मिश्रण गाळून घेते आणि इडलीच्या पिठात मिसळते. त्यानंतर इडल्या निळ्या रंगाच्या होताना दिसून येतात.
आणखी वाचा : पाकिस्तानी यूनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांसमोर अश्लिल डान्स, VIRAL VIDEO नंतर पाठवली नोटिस
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ गेल्या महिन्यात शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत ८.२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. या व्हिडीओला जवळपास ३२,००० पेक्षा जास्त लाईक्स देखील मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या. काहींनी फुले खाण्यायोग्य असल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले.