Viral video: सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही.मारामारीचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पण यावेळी एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे.जर तुम्हाला असे वाटत असेल की, मारामारी फक्त पुरुषांमध्ये होते तर तुम्ही चुकीचे आहात. काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढतात. त्यात ते एकमेकांचे केस ओढतात, त्यांना लाथा-बुक्की घालतात, चपलीने मारतात. सध्या सोशल मीडियावर असाच महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला एकमेंकांशी भांडताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्या चक्क मच्छी मार्केटमध्ये एकमेकींशी भिडल्या आहेत. एवढंच नाहीतर चक्क मासेही एकमेकींना फेकून मारले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही हा व्हिडीओ पाहून डोक्याला हात लावाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मच्छी मार्केटमध्ये ग्राहकांची खूप गर्दी दिसत आहे. यावेळी प्रत्येकजण मासे घेण्यासाठी गर्दी करत आहे. यावेळी मासे विकणारी महिला आणि ग्राहक महिलांमध्ये वादाला सुरुवात होते. मासे खरेदीसाठी आलेल्या महिलेने त्यांना जास्त स्वस्त:त मासे मागितले असणार किंवा मासे खराब आहेत असं म्हटलं असणार. त्यावर मासे खरेदीसाठी आलेली महिला समोर असलेले मासे आपल्या हाताने पुढे ढकलते. त्यावर मासे विकणारी महिला तिला एक मासा फेकून मारते. त्यानंतर दोघीही आक्रमक होतात आणि एकमेकिंना मासे फेकून मारतात. यावेळी आणखी एक महिला येते आणि सगळे मासे हातानं खाली फेकते. यावेळी मासे विकणारी महिलाही तिला मासे फेकून मारते.

boy and girl fight in stadium Video viral
स्टेडियममध्ये प्रेक्षकांची तुंबळ हाणामारी, स्टँडमध्ये बसलेल्या मुलीने समोरच्याला कानशिलात लगावली अन्… VIDEO होतोय व्हायरल
E Rickshaw Viral Video
बाईकपासून सायकलपर्यंत रस्त्यात सर्वांना ठोकत गेली ई-रिक्षा अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल; पाहा व्हिडीओ
new york city women assaulted belt
Video : “पट्ट्याने गळा आवळला, दोन गाड्यांमध्ये ओढलं आणि…”, मोठ्या शहरातील घटनेने खळबळ
Loksatta viva Summer dew Summer drinks
उन्हाळ्यातील गारवा!
Best Selling SUV Car
मारुती, ह्युंदाईच्या कार नव्हे तर देशातील ‘या’ सर्वात स्वस्त SUV ची तुफान खप, मायलेज २६ किमी, किंमत…
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL2024 : कोलकातासाठी २४.७५ कोटींचा गोलंदाज पडला महागात, फक्त पॉवरप्लेमध्ये दिल्या आहेत तब्बल ‘इतक्या’ धावा
Over 30 goats and sheep crammed into car
विकृतीपुढे जग हरलं! कारमध्ये खचाखच भरल्या ३० हून अधिक शेळ्या आणि मेंढ्या; VIDEO होतोय व्हायरल
The color world of Mumbai Mumbai Marmirags Author Ramu Ramanathan
मुंबईच्या रंगविश्वाची बखर

काही वेळाने मासे विकत घेण्यासाठी आलेल्या महिलांच्या ओळखीचे तरुण तेथे येतात आणि त्यांना शांत करत तेथून घेऊन जातात. दरम्यान हा व्हिडीओ भारतातील नसल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @boonsankeaw या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाईक्स अन् व्ह्यूज आले आहेत. अनेकजण यावर प्रतिक्रियाही देत आहेत.