महिलांसाठी सुरक्षित ठिकाण असं नेमकं कोणतं असा प्रश्न खरं तर मनात येता कामा नये. कारण किमान येत्या काही वर्षांमध्ये तरी जगभरात सर्व ठिकाणं शहरात किंवा ग्रामीण भागही महिलांसाठी सुरक्षित असतील अशी आशा अनेक महिला करतात. अशातच नुकताच भारतात कोणती शहरं महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित आहेत याबाबत आकडेवारी सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन विमेन सेफ्टी २०२५ या अहवालात सुरक्षित आणि असुरक्षित अशा शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

देशभरातून ३१ शहरांमधील १२ हजार ७७० महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ४० टक्के महिलांना त्यांच्या शहरात सुरक्षित वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक सुरक्षित वाटणारी शहरं कोणती?

मुंबई
कोहिमा
विशाखापट्टणम
भुवनेश्वर
आयझॉल
गंगटोक
इटानगर

सर्वाधिक असुरक्षित वाटणारी शहरं कोणती?

पाटणा
जयपूर
फरिदाबाद
दिल्ली
कोलकाता
श्रीनगर
रांची

यामध्ये अशाही महिलांची मतं विचारात घेण्यात आली ज्यांना ऑफिसमधल्या छळालाही सामोरं जावं लागलं. अर्ध्याहून अधिक महिलांना तर ऑफिसमधील लैंगिक छळाविरूद्धही नियम आहेत हे ठाऊकच नव्हते. ७ टक्के महिलांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे सांगितले. तसंच २४पेक्षा कमी वय असणाऱ्या गटासाठी हे प्रमाण १४ टक्के होतं.

या अहवालात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ २५ टक्के महिलांना असा विश्वास आहे की सुरक्षेविषयीच्या तक्रारींबद्दल यंत्रमा योग्य पावलं उचलू शकते. तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न अपुरे पडत असल्याचे ६९ टक्के महिलांनी म्हटले आहे.

स्थानिक परिसर आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान गैरवर्तन होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र महिला याबाबत तक्रार नोंदवत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. याचाच अर्थ एनसीआरबीपर्यंत बरीच प्रकरणं पोहोचतच नाहीत.