Red fire ants invade Britain: दंश करणाऱ्या या लाल अग्नी मुंग्यांचे वर्णन ‘जगातील सर्वात आक्रमक प्रजाती’ म्हणून केले गेले आहे. पूर्वी या मुंग्या इतर खंडांपुरत्या मर्यादित होत्या, मात्र हवामान बदलामुळे आता या मुंग्या वेगाने ब्रिटनच्या दिशेने सरकत आहेत, असे सांगण्यात येत आहे. शास्त्रज्ञांच्या या इशाऱ्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार,”या लाल अग्नी मुंग्यां ब्रिटनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.” असे सांगितले जात आहे की, ”वैज्ञानिकांनी ८८ लाल मुंग्यांचे वारुळ ओळखली आहेत, जी इटलीच्या सिसिली बेटावर सिराक्यूस शहराजवळ ५ हेक्टरमध्ये पसरलेली आहेत.” असे म्हटले जाते की, ”लवकरच या दंश करणाऱ्या लाल मुंग्या लंडनसह प्रमुख शहरे काबीज करू शकतात.

Mark-Zuckerberg Top 10 richest people in the world
Mark Zuckerberg : ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस यांना टाकलं मागे; संपत्ती कितीने वाढली?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta editorial India dominates Chess Olympiad Tournament
अग्रलेख: सुखद स्वयंप्रज्ञेचे सुचिन्ह!
Pimpri-Chinchwad cameras AI technology,
आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी
Dyslexia brain connection| What is Dyslexia
Dyslexia brain research: मेंदू संदर्भातील नव्या संशोधनाने मिळणार डिस्लेक्सियाच्या उपचारांना दिशा; अध्ययन अक्षमता नेमकी का निर्माण होते?
A combination of chemistry and fund management
बाजारातली माणसं: रसायनशास्त्र ते निधी व्यवस्थापनाचे संयुग!- प्रमोद पुराणिक
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार

हेही वाचा – Viral Video : आईच्या लग्नामध्ये लेकाने लावली हजेरी; सावत्र वडिलांना म्हणाला, ”तुम्ही…

स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजीचे अभ्यासक रॉजर व्हिला यांच्या मते, ”या मुंग्या युरोपातील अर्धा शहरी भाग व्यापू शकतात. असे म्हटले जात आहे की, ”या लाल अग्नी मुंग्या बार्सिलोना, रोम, लंडन किंवा पॅरिससारख्या मोठ्या शहरांवर देखील परिणाम करू शकतात, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होऊ शकतो. हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे मानले जात आहे.”

या संपूर्ण प्रकरणावर ते म्हणतात, ”अशा प्रकारे या मुंग्या अनियंत्रितपणे पसरण्याआधी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे. ही मुंगी तिच्या वेदनादायक दंशामुळे आणि त्यांच्या घरट्यांमधील विशिष्ट वारुळांमुळे शोधणे शक्य आहे. पण हे काम करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असेल.”