Anand Mahindra Tweet: wrestler geeta phogat buys new launched scorpio n anand mahindra says its a bonus | Loksatta

दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”

Anand Mahindra Tweet: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्राने अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची डिलिव्हरी सुरू केली आहे.

दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”
फोटो( प्रातिनिधिक)

Anand Mahindra Tweet: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्राने अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची डिलिव्हरी सुरू केली आहे. डिलिव्हरीच्या पहिल्याच दिवशी, ऑलिम्पिक पदक विजेती गीता फोगटने तिच्या घरी महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे स्वागत केले. आनंद महिंद्रा यांना ही बातमी कळताच त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गीता फोगटने अशी ‘अतुलनीय कार’ बनवल्याबद्दल महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत ज्याला आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्विटमध्ये आपला आनंद व्यक्त करताना फोगट म्हणाले, “एवढ्या सुंदर दिवशी किती छान सकाळ आहे.. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्या नवीन सदस्याचे आमच्या घरी स्वागत आहे (महिंद्रा स्कॉर्पिओ-एन) @anandmahindra सर अशी कार लाँच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अविश्वसनीय कार- खूप धन्यवाद. उत्कृष्ट सेवेबद्दल पीपी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कर्नालचे आभार.

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: ‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव)

आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया

गीता फोगटच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, हा आमच्यासाठी बोनस आहे. गीता फोगट सारख्या प्रतिभावान व्यक्तिने स्कॉर्पिओ एन कारची निवड करणे आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. तुमच्या सुवर्णपदकाच्या गौरवाचा आनंद आम्ही घेत आहोत, आम्हाला खात्री आहे की ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल.

नुकत्याच लाँच झालेल्या Scorpio N च्या चाहत्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. या वाहनाची लोकप्रियता एवढी आहे की, बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत या वाहनाचे १ लाखांहून अधिक लोकांनी बुकिंग केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video: अंतराळात महिला करत होती योगा, शून्य ग्रॅव्हिटीमध्ये असं काही झालं की..पृथ्वीवासी झाले थक्क

संबंधित बातम्या

गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video
गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, १ किलोची किंमत ऐकून नेटकरी म्हणाले “इतक्यात तर…”
ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा