लग्नसमारंभातील व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. वर-वधूची हटके एन्ट्री ते लग्नाच्या विधीदरम्यान घडणाऱ्या आनंददायक घटनांपर्यंत, हे सर्व आपण पाहिले आहे.२०२१ हे लग्नाच्या मजेदार व्हिडीओंचे वर्ष ठरले. चला या वर्षभरातील अशा पाच सर्वोत्कृष्ट व्हायरल लग्नाच्या व्हिडीओंवर एक नजर टाकूया ज्यांनी आपलं चांगलाचं मनोरंजन केलं.

घोडी वरासह पळून जाते

राजस्थानमधील अजमेरजवळील रामपुरा गावात लग्नाची घोडी वरासह पळून गेल्याचा व्हिडीओ जुलैमध्ये व्हायरल झाला होता. वर लग्नाच्या ठिकाणी येण्याची वाट पाहत असताना फटाका फुटल्याने घोडी घाबरली. तिचा ताबा सुटला आणि पाठीवर बसलेल्या वराला घेऊन पळून गेली.

( हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

वराने घोड्यावरून उतरण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. सगळे त्यांच्यामागे कार आणि बाईकवरून चार किलोमीटर वराच्या मागे गेले. सुदैवाने, वराला दुखापत झाली नाही आणि त्याला सुखरूप परत लग्नस्थळी नेण्यात आले.

हेलिकॉप्टर विवाहसोहळ्यावर माणसाची विनोदी कॉमेंट्री

राजस्थानमधून व्हायरल झालेला आणखी एक लग्नाचा व्हिडीओ म्हणजे हेलिकॉप्टरच्या विवाहवर एका माणसाचे केलेली विनोदी कॉमेंट्री. हेलिकॉप्टर विवाह म्हणजे काय हे स्पष्ट होईल असे सांगून त्या माणसाने आपली कॉमेंट्री सुरू के;इ “ये विकास और प्रगती का पर्यवची माना गया,” तो म्हणाला.

(हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

पुढे कॅमेरा एका गायीकडे वळवला, तेव्हा त्याने कॉमेंट्रीला एक मजेदार ट्विस्ट दिला, “यहाँ गाय भी जल्दी-जल्दी अपना दूध निकलवाने जा रही है ताकी वो भी वापस आके हेलिकॉप्टर को उडता हुआ देखे.”

जेव्हा वर म्हणतो की, “मी आधी मेकअप करणार”

ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर वधूच्या आधी मेकअप करून घेण्यासाठी उत्साही असलेल्या देसी वराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. “लडकियाँ मेकअप करते हैं तो लडके क्यू ना काराये? मै तो साफ बोल दू… मै तो करूंगा,” वराने मेकअप आर्टिस्टला सांगितले.

( हे ही वाचा: शिकार करायला आलेल्या सिंहाला म्हशीनेच केलं रक्तबंबाळ; बघा Viral Video)

वधूने वराला लवकर तयार होण्यासाठी विनंती केली, परंतु त्याने आपले सर्वोत्तम दिसण्याचा निर्धार केला होता आणि तो क=मेकअप करून घेत होता.

पाकिस्तानी वधू-वराची जेसीबीवरून एन्ट्री

पाकिस्तानमधील एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या गावात येण्यासाठी जेसीबीचा पर्याय निवडला. जेसीबीच्या पुढच्या बाजूला उभे राहून लग्नाच्या कपड्यात जोडप्याच्या एन्ट्रीच्या एका व्हिडीओने ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर मोनोरंजन केले. एका युजरने गंमतीत कमेंट केली होती, “बांधकामवाला नवरदेव.”

( हे ही वाचा: Video: आसाममध्ये हत्तीने माणसाचा पाठलाग केला आणि त्याला चिरडले…; थरारक घटना कैमेऱ्यात कैद)

हा व्हिडीओ पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागातील हुंजा खोऱ्यातील असल्याचे सांगितलं जात.

रोमँटिक डान्स स्टेप करताना नवविवाहित जोडपे पडले

रोमँटिक डान्स स्टेप करत असताना वधू आणि वर खाली पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ते नाचताना एकमेकांच्या डोळ्यात पाहत असल्याचे दिसून आले. तथापि, क्लासिक रोमँटिक स्टेपसाठी वधू खाली वकते तेव्हा ती तिचा तोल गमावते आणि वरासह खाली पडते.

(हे ही वाचा: नवरी पहिल्यांदाच पोहोचली सासरच्या घरी, तिला बघताच नवरा गेला पळून; काय आहे प्रकरण जाणून घ्या)

अशा अनेक लग्नातील व्हिडीओने यंदा आपलं मनोरंजन केलं. यातला तुम्हला कोणता व्हिडीओ जास्त आवडलेला?