आसाममध्ये हत्तीने माणसावर हल्ले केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कधी हे हत्ती गावात घुसतात तर कधी शेतात काम करणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. दरम्यान, हत्तीच्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. शेतात पळत हत्ती माणसावर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

नक्की काय झालं?

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हत्तींच्या हल्ल्याची ही घटना आसाममधील धुबरी जिल्ह्यातील आहे. येथील तामरहाट परिसरात काही लोक शेतात काम करत होते. दरम्यान, तेथे एका हत्तीने हल्ला केला. हा हत्ती पळताना आणि हल्ला करताना दिसत आहे.

(हे ही वाचा:Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं )

या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. धावताना एक व्यक्ती पडल्याचे दिसून येते. त्याचा पाठलाग करणारा हत्तीही खूप चिडलेला दिसत आहे. तो त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याच्यावर हल्ला करतो. व्हिडीओ पाहून कळते की या हल्ल्यात त्या व्यक्तीला जास्त लागलेलं असावं.

(हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

काय म्हणाले अधिकारी?

घटनेनंतर वन अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की ही घटना खूपच भयावह होती. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो गंभीर जखमी झाला आहे. यानंतर हत्तीलाही जंगलाच्या दिशेने पळवण्यात आले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.