झारखंडमधील गोड्डा येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक नववधू पहिल्यांदाच सासरच्या घरी पोहोचल्यावर तिने संपच पुकारला. दरम्यान, संधी पाहून वराने मात्र पळ काढला. सासरच्या लोकांनी वधूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने कोणाचेच ऐकले नाही. शेवटी पोलिसांनाच मदतीला यावे लागले. पोलिसांनी वधूला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

नक्की काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गोड्डा येथील कानभारा गावचे आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने ८ महिन्यांपूर्वी गावातील हरिराम नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. वधूचा आरोप आहे की लग्नाला ८ महिने उलटले तरी तिचा नवरा तिला त्याच्या घरी घेऊन जात नव्हता. यामुळे तिने कुटुंबीयांसह सासरचे घर गाठले. मात्र सासरच्यांनी तिला शहरात प्रवेश दिला नाही.

(हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

सारखी करत होता टाळाटाळा

महिलेने सांगितले की, तिचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार मंदिरात झाले. यानंतरही तिचा नवरा तिला घरी नेण्यास तयार नव्हता. याबाबत आधी घरच्यांना सांगेन, मगच घरी घेऊन जाईल, असे सांगून तो महिलेला टाळत होता. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि एके दिवशी पती घरातून पळून गेला.

(हे ही वाचा:टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video)

घराबाहेर बसून राहिली महिला

यानंतर महिलेने स्वतःच सासरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सासरच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्यांनी महिलेवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी तिला घरातही घेतलं नाही आणि त्यानंतर महिला घराबाहेर बसून राहिली. हे पाहून पतीने घटनास्थळावरून पळ काढला. लग्नाचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा महिलेने केला आहे.

(हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळते लवकर यश, त्यांच्यावर असतो धन देवता कुबेरचा आशीर्वाद)

महिलेला करायचा नाही दाखल गुन्हा

महिलेला घरा बाहेर बसलेले पाहून गावातील लोक जमा झाले, प्रकरण वाढल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात नेले. या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देताना गोड्डाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद मोहन सिंग म्हणाले की, महिलेने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असून तिला तिच्या सासरच्या घरी जायचे आहे. सासरच्या मंडळींना महिलेला घरात ठेवायचे नाही.