कौतुकास्पद… १२ दिवसात त्याने निर्वासितांसाठी ८२ कोटी गोळा केले; Guinness बुकातही झळकला

दुबईमधील एका यूट्यूब स्टारने तब्बल १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्ये राहून लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. अबोफ्लाह असं या युट्यूबरचं नावं असून तो सलग १२ दिवस लाइव्ह स्ट्रीमिंग करत होता. जॉर्डन, लेबनॉन, इराकमध्ये आलेल्या थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणाऱ्या निर्वासितांना मदत करण्यासाठी अबोफ्लाहने हा असा वेगळा उपक्रम राबवला. बुर्ज पार्कमध्ये तो १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्येच राहत […]

YouTube star AboFlah
त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. (फोटो इन्टाग्रामवरुन साभार)

दुबईमधील एका यूट्यूब स्टारने तब्बल १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्ये राहून लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. अबोफ्लाह असं या युट्यूबरचं नावं असून तो सलग १२ दिवस लाइव्ह स्ट्रीमिंग करत होता. जॉर्डन, लेबनॉन, इराकमध्ये आलेल्या थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणाऱ्या निर्वासितांना मदत करण्यासाठी अबोफ्लाहने हा असा वेगळा उपक्रम राबवला. बुर्ज पार्कमध्ये तो १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्येच राहत होता. यामधून त्याने १.१ कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८२ कोटींची देणगी गोळा केलीय.

अबोफ्लाहने यामधून जमवलेल्या या पैशांमधून निर्वासितांपैकी १ लाख १० हजार जणांना मदत केली जाणार आहे. या पैशांमधून निर्वासितांसाठी जेवणाची आणि गरम कपड्यांची सोय केली जाणार आहे. तसेच सीरिया आणि इजिप्तमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांनाही यामधून मदत केली जाणार आहे.

अबोफ्लाह हा डाऊनटाउन दुबईमध्ये सात जानेवारीपासून १९ जानेवारीपर्यंत ग्लासच्या बॉक्समध्ये होता. या आगळ्या वेगळ्या लाइव्ह स्ट्रीमिंगमधून एक कोटी डॉलर्स जमवण्याचं त्याचं लक्ष्य होतं. हे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर तो बुधवारी रात्री या काचेच्या बॉक्समधून बाहेर आला. त्याने केलेलं लाइव्ह स्ट्रीमिंग २.३७ कोटींहून अधिक फॉलोअर्सने पाहिलं. तसेच जगभरातील एक लाख ५४ हजार ७८९ जणांनी या कामासाठी अबोफ्लाहला पैशांच्या रुपात देणगी दिली.

नक्की पाहा हे फोटो >> अबोफ्लाहने नक्की काय केलं, चाहत्यांनी केलेली गर्दी अन् ८२ कोटी…

अबोफ्लाहचं खरं नाव हसन सुलेमान असून त्याने, “सुरुवातीला असं वाटलं होतं की एक कोटी डॉलर्स जमवण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागेल. मात्र हे लक्ष्य १२ दिवसांमध्येच पूर्ण झाल्याचा आनंद आहे,” असं सांगितलं आहे. ग्लासच्या बॉक्समध्ये राहून अबोफ्लाहने २६८ तास, १४ मिनिटं, २० सेकंद लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. हा एक गिनीज विक्रम आहे. त्यामुळे अबोफ्लाहचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. त्याने चीनच्या चोंगकिंग चांगन ऑटोमोबाइल कंपनी २५९ तास, ४६ मिनिटं आणि ४५ सेकंद लाइव्ह स्ट्रीम करण्याचा विक्रम मोडलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youtube star aboflah raises 11 million usd by living from glass box in dubai scsg

Next Story
IND vs SA : ‘ये तो शुरू होते ही खत्म’, विराट शून्यावर बाद; ट्विटर ट्रेंड होतोय DUCK!
फोटो गॅलरी