पीटीआय, लखनऊ

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामात आपले विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असून आज, शनिवारी त्यांच्यासमोर पंजाब किंग्जचे आव्हान असेल. यंदाच्या हंगामातील लखनऊचा हा दुसरा, तर पंजाबचा तिसरा सामना असेल.

riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
what Saina Nehwal Said?
“मग मी काय करायला हवं होतं?”, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा ‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेसला थेट प्रश्न
rahul gandhi bharat jodo nyay yatra will end with rally at shivaji park in mumbai
“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

लखनऊला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात कृणाल पंडय़ा वगळता लखनऊच्या सर्वच गोलंदाजांनी निराशा केली. आता हंगामातील पहिला विजय मिळवायचा झाल्यास, लखनऊच्या गोलंदाजांना पंजाबविरुद्ध प्रभाव पाडावा लागेल.

दुसरीकडे, पंजाबच्या संघाने चंडिगड येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला नमवले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडून हार पत्करावी लागली. लखनऊविरुद्ध विजयी पुनरागमनाचा त्यांचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>RCB vs KKR : कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजयी विक्रम कायम, केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

राहुल, बिश्नोईवर नजर

मार्क वूड आणि डेव्हिड विली यांच्या अनुपस्थितीत लखनऊची गोलंदाजी कमकुवत भासत आहे. मोहसिन खान, नवीन उल हक आणि यश ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. लखनऊकडे शमार जोसेफला खेळवण्याचा पर्याय आहे. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने लखनऊचा लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि कर्णधार केएल राहुल यांच्यासाठी यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बिश्नोईला कामगिरी उंचवावी लागेल. पहिल्या सामन्यात राहुलने यष्टिरक्षण करतानाच सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याने अर्धशतकही साकारले. त्याचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. त्याचा साथीदार क्विंटन डिकॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन यांचे योगदानही लखनऊसाठी महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा >>>RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

बेअरस्टो, करनवर मदार

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाने ‘पॉवरप्ले’मधील आपली धावगती वाढवणे आवश्यक आहे. विशेषत: जॉनी बेअरस्टोने आक्रमक शैलीत खेळतानाच कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. त्याला धवनची साथ मिळाल्यास पंजाबच्या मधल्या फळीवरील दडपण कमी होईल. डावखुऱ्या धवनने गेल्या सामन्यात बंगळूरुविरुद्ध ४५ धावा केल्या होत्या. प्रभसिमरन सिंगला चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करावे लागेल. अष्टपैलू सॅम करनने दोन्ही सामन्यांत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. मात्र, गोलंदाजीत त्याला चमक दाखवता आली नाही. जितेश शर्मालाही आपली कामगिरी उंचवावी लागेल. वेगवान गोलंदाजांमध्ये कगिसो रबाडाला करन, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल. फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांच्यावरही लक्ष राहील.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.