Momos Party Uttarakhand Village Video Viral : जेव्हा तुम्ही पार्टीचा विचार करता, त्यावेळी तुमच्या मनात पहिल्यांदा कोणती गोष्ट येते? कदाचित तुम्हाला मित्रांसोबत क्लब पार्टी करायला आवडत असेल किंवा तुमच्या घरात मित्रांना एकत्रित बोलावयला आवडेल. पण अशा पार्ट्यांमध्ये चविष्ट पदार्थ खायला मिळाले नाहीत, तर पार्टी करण्याची मजाच निघून जाते. पण पार्टीमध्ये पिझ्झा किंवा मोमोज खायला मिळणार असेल, तर मग पार्टीत गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. कारण एका यू ट्यूबरने अशाच प्रकारची भन्नाट मोमो पार्टी उत्तरखंडमधील बुरान्स खांडा या गावाला दिली आहे. अश्वानी थापा असं पार्टी देणाऱ्या तरुणाचं नाव आहे. ही जबरदस्त पार्टी आयोजित करण्यासाठी थापाला काय काय करावं लागलं हे या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

थापाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मोमो पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मोमो पार्टीसाठी मी ५०० लोकांना बोलावलं’ असं याचं टायटल आहे. व्हिडीओत थापा मोमो, प्लेट्स आणि कप्स तयार करताना दिसत आहे. त्यानंतर तो लोकांना बसण्यासाठी कारपेटची व्यवस्था करतो. त्यानंतर या पार्टीत डीजेची धमाल पाहायला मिळते. थापा गावात जाऊन सर्वांनाच पार्टीसाठी आमंत्रण देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या पार्टीत अबालवृद्धांपासून सर्वांनीच सहभाग घेतल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – पॅसिफिक महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला सापडला ‘हा’ दुर्मिळ मासा, सर्वांना चकीत करणारा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण जेव्हा पार्टी सुरु होते त्यावेळी पाऊसाच्या सरी कोसळतात आणि थापा पार्टी सोडून जाऊ नका, असं लोकांना सागंत असतो. थापा पाऊस थांबण्याची वाट पाहत असताना काही माणसं त्याच्याजवळ येतात. त्यानंतर माणसांची संख्या वाढते आणि जवळपास गावातील सर्व मंडळी थापाच्या पार्टीत सामील होतात. त्यामुळे थापाने आयोजित केलेली मोमो पार्टी यशस्वी होते. पार्टी संपल्यानंतर थापा जमिनीवर असलेला केरकचरा साफ करून परिसर स्वच्छ ठेवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.