फॅशन का जलवा ! चहलच्या होणाऱ्या बायकोचा ब्लॅक ड्रेसमधला हॉट लूक पाहिलात का??

सोशल मीडियावर धनश्रीच्या लूकची चर्चा

टीम इंडियाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये RCB चं प्रतिनिधीत्व करणारा युजवेंद्र चहल सध्या मैदानासोबत सोशल मीडियावरही चांगलाच हिट असतो. धनश्री वर्मा या आपल्या होणाऱ्या बायकोसोबत रोमँटीक अंदाजातले फोटो, व्हिडीओ चहल सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. आयपीएलसाठी युएईला रवाना होण्याआधी चहल आणि धनश्री यांचा पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी धनश्रीही युएईत दाखल झाली आहे.

RCB च्या सामन्यांना धनश्रीने मैदानात हजेरी लावलेली आपण अनेकदा पाहिलं आहे. याव्यतिरीक्त युएईत हॉटेल रुम किंवा एका सुंदर लोकेशनवर चहल आणि धनश्रीचा डान्स सुरुच असतो. RCB चा कर्णधार विराट कोहलीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या पार्टीसाठी धनश्रीने ब्लॅक ड्रेस घातला होता. चहलने आपल्या होणाऱ्या बायकोचे हे फोटो काढले असून सोशल मीडियावर सध्या धनश्रीच्या या हॉट लूकची चर्चा सुरु आहे.

सलग ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही KKR पेक्षा चांगला रनरेट राखल्यामुळे RCB ला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं. पहिल्या एलिमीनेटर सामन्यात RCB समोर फॉर्मात असलेल्या SRH चं आव्हान आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yuzvendra chahal would be wife dhanashree varma share her stunning pictures in black dress clicked by chahal with funny caption psd

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या