Zomato Viral Post: लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomatoवर एका डिलिव्हरी बॉयचे खाते निलंबित केल्याबद्दल ऑनलाइन टीका होत आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या वापरकर्त्याने एक्स ( पुर्वीचे ट्विटर)वर पोस्ट टाकून ही घटना उघडकीस आणली. सोहमला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय भेटला होता. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने सांगितले की, “बहिणीच्या लग्नाआधी कंपनीने त्याचे झोमॅटो अकांऊट बंद केले आहे. ढसा ढसा रडणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोहमने शेअर केला आहे.” व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय प्रत्येकाला पैसे मागत आहे. व्हिडओमध्ये त्याने सांगितले की, त्याने काही खाल्ले नाही. सर्व काही बहिणीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवले होते. भट्टाचार्यने पुढे सांगितले की, झोमॅटो अकांउट बंद झाल्यापासून तो रॅपिडोसाठी काम करत आहे. त्याने लोकांना डिलिव्हरी बॉयची मदत करण्याचे आव्हान केले आणि अकांऊटचा क्युआर कोड शेअर केला आहे.

सोहम भट्टाचार्य याची पोस्ट

बहिणीच्या लग्नाआधी झोमॅटो अकाउंट बंद, ढसाढसा रडला डिलिव्हरी बॉय

सोहम भट्टाचार्य नावाच्या व्यक्तीने २८ मार्च रोजी X वर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आणि सांगितले की, “कंपनीने त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या आधी त्याचे खाते बंद केले. ही पोस्ट काही वेळात व्हायरल झाली आणि २४ तासांपेक्षा कमी वेळात २९ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली.

यानंतर झोमॅटो कंपनीनेही प्रतिसाद दिला. त्यांनी लिहिले, “आम्ही आमच्या डिलीव्हरी पार्टनर्सला खूप महत्त्व देतो आणि खाते बंद करण्यासारख्या कृतींचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आम्हाला समजते. खात्री बाळगा, आम्ही अशा बाबी गांभीर्याने घेतो. आम्ही तुम्हाला खात्री देतो की “आम्ही याची चौकशी करू. आमचे डिलिव्हरी पार्टनर आमच्या ग्राहकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.”

हेही वाचा – बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा – माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

या पोस्टवर, अनेकांनी झोमॅटोवर त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरला अडचणीत टाकल्याबद्दल टीका केली आहे. एकाने लिहिले, “कृपया त्याचे Zomato खाते पुन्हा सक्रिय करा. कामगार वर्ग हा आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ते प्रथम त्यांच्या रोजच्या अन्नासाठी जुगाड करतात, ही त्यांची रोजची लढाई आहे. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत जेणेकरून ते आरामदायी जीवन जगू शकतील. पैशाशिवाय कोणी कसे जगेल?” तर दुसऱ्याने लिहिले, “तुम्ही तुमच्या डिलिव्हरी पार्टनरचा अधिक आदर केला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागता त्यावरून तुम्ही तुमच्या ग्राहकांना किती महत्त्व देता हे दिसून येते. एखाद्या डिलिव्हरी पार्टनरचा अनादर झाल्याची ही पहिलीच घटना नाही.”