जवळपास असणाऱ्या एखाद्या हॉटेलबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तिथल्या पदार्थांची चव आणि सर्व्हिसबद्दल माहिती हवी असेल तर अनेकांची पसंती झोमॅटो अॅपला असते. मात्र सध्या हे अॅप वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. या अॅपने दिल्ली परिसरातील अनेक भागात जाहिरातबाजी करणारे फलक लावले आहेत. पण, या जाहिरातबाजीमुळे झोमॅटोनं लोकांचा रोष ओढवून घेतला आहे.

Viral Video : ‘या’ अम्पायरचे ठुमके पाहून तुम्हाला बिली बाउडन आठवतील

आपल्या नव्या जाहिरातीत झोमॅटोनं ‘बीसी.’, ‘एमसी.’ असे शब्द वापरले आहे. अनेक तरूणांना या शब्दाचे अर्थ वेगळे सांगायला नको. कारण, त्या शब्दांचे अर्थ बरेच वेगळे निघतात. म्हणूनच झोमॅटोनं हेतूपरस्पर हे शब्द वापरले आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणूनच ही जाहिरात लोकांना मुळीच आवडली नाही. लोकांनी ट्विट करत आपला रागही व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या शब्दांचा अर्थ ‘मॅक अँड चीज’ आणि ‘बटर चिकन’ असा होतो असं झोमॅटोचं म्हणणं आहे.

Viral Video : निर्दयी मालकानं पाळीव श्वानाला गोठवलं

लेखक सुहेल सेठ यांनीही झोमॅटोबद्दलचा राग व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत झोमॅटोची ही जाहिरात अत्यंत लाजिरवाणी आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी ही बाब माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्याही निदर्शनास आणून दिली आहे.