27 September 2020

News Flash

पोलिसांनी केली तरुणाची धुलाई; ऋषी कपूर म्हणाले आपल्याला अशा शिस्तीची गरज

खिल्ली उडवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी केली धुलाई

करोना विषाणूमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र तरीही काही लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. वारंवार सांगूनही रस्त्यांवर फिरत आहेत. अशा लोकांना थांबवण्यासाठी कडक पावले उचलायला हवीत. असे मत अभिनेता ऋषी कपूर यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले ऋषी कपूर?

ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इटलीमधील आहे. एक व्यक्ती संचारबंदी असतानाही घराबाहेर पडला आहे. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांचीच खिल्ली उडवत आहे. दरम्यान एक पोलीस मागून येतो आणि त्याची धुलाई करतो. असे दृश्य या व्हिडीओमध्ये आहे. “अपल्याला अशा शिस्तीची गरज आहे.” असे म्हणत ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या व्हिडीओमधील पोलिसांचे कौतुक देखील केले आहे.

काय आहे करोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

‘करोना व्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 6:00 pm

Web Title: rishi kapoor shares video of italy lockdown police arrest man mppg 94
Next Stories
1 अंधश्रद्धा पसरवणारं ‘ते’ ट्विट बिग बींनी केलं डिलिट
2 जनता कर्फ्यूला कोल्हापूरकारांचा झणझणीत प्रतिसाद, मटणाच्या दुकानासमोर रांगाच रांगा
3 “तुम्ही पापं केली म्हणून आला करोना”; अभिनेत्रीने केलं वादग्रस्त विधान
Just Now!
X