बोरीवली प्रकरणावरून चित्रा वाघ यांचा महापौरांवर निशाणा; म्हणाल्या, “आपल्याच पक्षातल्या लोकांकडे…”

मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या सर्व प्रकारावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

chitra- kishorii

मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी बोरिवलीत ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. या सर्व प्रकारावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात कोणीच आरोपींना पाठीशी घालत नाहीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कसून चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारं पत्र दिलं आहे. तसेच पीडित महिला ही नगरसेविकाला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याची धमकी देत असल्याचंही म्हटलंय. पीडिता धमकी देत असली तरी आम्ही तिच्या बाजूने आहोत, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसंच वर्ष उलटूनही बोरीवली पोलिसांनी तक्रार दाखल का करून घेतली नाही, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

दरम्यान महापौर पेडणेकर यांनी थोबाड फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, तेव्हा तुम्हाला त्यांचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असा सवाल केला. तसेच तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असंही चित्रा वाघ यांनी विचारलं. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणं तुम्हाला शोभत नाही, असं वाघ किशोरी पेडणेकर यांना म्हणाल्या.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chitra wagh slams mumbai mayor kishori pednekar over female bjp worker sexual harassment in corporator office borivali hrc

Next Story
मुलाला वाचवण्यासाठी कोसळत्या भिंतीखाली उभी राहिली आई! पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी