अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच ३६ वा वाढदिवस साजरा केला. कथित प्रियकर निक जोनाससोबत प्रियांकाने हा खास दिवस साजरा केल्याचं दिसून येत आहे. ‘भारत’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परतलेल्या प्रियांकाबरोबर निकदेखील आल्यामुळे या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी निक आणि प्रियांका यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना अनेक वेळा नेटकऱ्यांच्या टीकेचं धनी व्हावं लागल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी निकने टीका करणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक प्रियांकापेक्षा लहान असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्यावर टीका होत असते. या टीकांवर निक आणि प्रियांका दोघांनीही कायम मौन बाळगलं असून टीका करणाऱ्यांना दूर कसं ठेवायचं हे निकला चांगलंच माहित आहे. त्यामुळे निकने एक फोटो शेअर करत टीकाकारांना चांगलंच उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. निकने शेअर केलेल्या फोटोला ‘ब्लॉकिंग दी हेटर्स लाइक’ असं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो प्रियांकाच्या वाढदिवशी काढलेला असून यात प्रियांकाने फोटोसाठी पोझ दिली असून यात निकदेखील दिसून येत आहे.

दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी ‘भारत’ चित्रपटासाठी भारतात आली असून यावेळी तिच्यासोबत निकदेखील आला आहे. निकच्या भारतात येण्यामुळे या दोघांमधील नात्याविषयी अनेक अफवा पसरल्या असून ते लग्न करणार असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे. मात्र यावर प्रियांका-निकने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas on haters his relationship with priyanka chopra
First published on: 22-07-2018 at 17:12 IST