बॉलिवूड अभिनेता सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स चॅट समोर येताच अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी)ने रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अटक केली. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार सुरु असलेल्या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावे घेतली. यात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश होता. पण आता अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी त्यांच्या टीमने अशी कोणतीही बॉलिवूड कलाकारांची यादी तयार केली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री समंथा अक्किनेनीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने एक स्क्रीन शॉट शेअर करत हॅशटॅग वापरले आहेत. सॉरी रकुल आणि सॉरी सारा असे ते हॅशटॅग आहेत.

‘फ्री प्रेस जर्नल’ला अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही बॉलिवूड कलाकारांची कोणतीही यादी तयार केलेली नाही. यापूर्वी तयार केलेली यादी ड्रग्स पेडलर आणि तस्करांची होती. त्यामुळे ती बाॉलिवूडची असल्याचा गोंधळ झाला.’

त्यानंतर सोशल मीडियावर सॉरी सारा आणि सॉरी रकुल प्रित हे हॅशटॅश ट्रेंड होऊ लागले. अनेकांनी सारा आणि रकुलचा फोटो पोस्ट करत हे हॅशटॅग वापरले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha akkineni shares post as internet apologises to sara ali khan rakul preet singh avb
First published on: 14-09-2020 at 19:51 IST