टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. चीनने ५ ऑगस्टपर्यंत तब्बल ३३ सुवर्णपदकं या स्पर्धेत जिंकली आहेत. गुरुवारी झालेल्या माहिलांच्या डायव्हिंग १० मीटर स्पर्धेमध्ये चीनच्या क्वान हँन्गचैन या मुलीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. क्वान ही केवळ १४ वर्षांची आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चीनच्या ऑलिम्पिक चमूमधील क्वान ही वयाने सर्वात लहान सदस्य आहे. तिने या स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्येही पहिलं स्थान मिळवलं होतं. नंतर अंतिम फेरीमध्येही तीने आपल्या कामगिरीमधील सातत्य कायम राखत सुवर्णपदक पटकावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोक्यो एक्वटिक्स सेंटरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये क्वानने एक नाही तर दोनवेळा परफेक्ट १० स्कोअर केला. एवढ्या कमी वयाच्या खेळाडूने सलग दोनदा परफेक्ट १० स्कोअर करणे हा देखील एक विक्रमच आहे. क्वानने एकूण ४६६.२० अंक मिळवले. रौप्यपदकही चीनच्याच महिला खेळाडूला मिळालं. चेन यूक्सीने ४३५.४० अंकांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या वू मलेसाने कांस्यपदक पटकावलं.

नक्की पाहा हे फोटो >> पदक कांस्य पण क्षण सुवर्ण… विजयाचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना दिला धीर; पाहा खास फोटो

चीनच्या क्वानसोबतच इतर देशांमधील कमी वयाच्या खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीची दखल संपूर्ण जगाला घ्यायला भाग पाडलं आहे. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जपानच्याच मोमिज निशियाने महिला स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. निशियाने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ही कामगिरी केलीय. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रमही निशियाने आपल्या नावावर केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

निशियाने १३ वर्षे ३३० दिवस वय असताना सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे स्केटबोर्डिंगला पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आलं आहे.  त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्केटबोर्डिंग स्पर्धेमध्ये निशियाने सुवर्णपदक जिंकलं त्याच स्पर्धेतील रौप्यपदक ब्राझीलच्या रेयस्सा लीलने जिंकलं. रेयस्सा ही १३ वर्षांचीच आहे. याशिवाय या स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या जपानच्याच फुना या मुलीचं वय १६ वर्षे आहे.

नक्की पाहा हे फोटो >> “सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

सीरियाचा हेंड जाजा ही अवघ्या १२ वर्षांची असून ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालीय. टेबल टेनिसच्या महिला सिंगल्समध्ये जाजा सहभागी झाली होती. मात्र ३९ वर्षीय ऑस्ट्रियन महिला खेळाडू ल्यू जियाविरुद्धचा सामना पराभूत झाल्याने जाजा स्पर्धेबाहेर गेली. जाजाला पराभूत करणाऱ्या ल्यूची ही सहावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

नक्की पाहा >> ऑलिम्पिकमधील एक मेडल ‘या’ गावाचा चेहरामोहरा बदलू शकतं

सोप्या शब्दात सांगायंच झाल्यास जाजाचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तिची प्रतिस्पर्धी असणाऱ्या ल्यूने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. टोक्योमधील तरुण खेळाडूंमध्ये जपानची १२ वर्षांची कोकाना हिराकीसुद्धा झाली होती. ती स्केटबोर्डिंग करते. उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये जपानकडून खेळणारी ती सर्वात लहान वयाची खेळाडू आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo 2020 quan hongchan 14 stuns world with two perfect 10s to win diving gold for china scsg
First published on: 05-08-2021 at 15:58 IST