राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांविषयीची अधिक माहिती-
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षणाच्या विविध संधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उपलब्ध असतात. राज्य सरकारच्या ४१६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या अभ्यासक्रमांना सुमारे १ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. खासगी आयटीआय संस्था ३१० असून त्यात ३५ हजार ५१२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
० सेंटर ऑफ एक्सलन्स :
सेंटर ऑफ एक्सलन्स या योजनेंतर्गत या संस्थांमध्ये  व्यावसायिक प्रशिक्षण देणारे काही अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचे आहेत. एक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर नवी दिल्लीस्थित नॅशनल सर्टििफकेट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) मार्फत परीक्षा घेतली जाते. हे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यावर प्रमाणपत्र एनसीव्हीटीमार्फत दिले जाते. यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीचे संबधित अभ्यासक्रमांतर्गत प्रगत प्रशिक्षण दिले जाते. बेसिक ट्रेनिंग आणि प्रगत प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या औद्योगिक आस्थापनांमार्फत सहा महिन्यांचे स्पेशलाइज्ड प्रशिक्षण दिले जाते अथवा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेंतर्गत पुढील उद्योगांनी औद्योगिक सहकार्य केले आहे-’ औंध आयटीआय- टाटा मोटर्स ’ अंबड आयटीआय- एनआरबी बिअरिंग्ज लिमिटेड- जालना ’ भंडारा आयटीआय- सनफ्लॅग आयर्न अॅण्ड स्टील कंपनी ’ रत्नागिरी आयटीआय- फिनोलेक्स * खेड, मालेगाव बुद्रुक, भोर आयटीआय- भारत फोर्ज, पुणे ’ शहापूर आयटीआय- जेएसडब्ल्यू स्टील, ठाणे ’ अकोला आयटीआय (मुलींची)- जे. एस. कॉर्पोरेशन ’ पठण आयटीआय- व्हिडीओकॉन उद्योग ’ घोडेगाव, माणिकडोह आयटीआय- मिहद्रा आणि मिहद्रा
* येवला आयटीआय- आकृती सिटी गोल्ड इन्स्टिटय़ूट, मुंबई
* राजूरा- आलापल्ली आयटीआय- बल्लापूर इंडस्टीज
* आयटीआय- अंबरनाथ- गोदरेज ’ लोणावळा, मुलुंड आयटीआय- ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स ’ सासवड आयटीआय- इलेक्ट्रॉनिक्स मशीन टूल्स, सासवड ’ वेल्हा आयटीआय- प्राज इंडस्ट्रीज ’ सातारा आयटीआय- थर्मेक्स ’ वाई आयटीआय- गरवारे वॉल रोप्स लिमिटेड ’ मुलुंड, जव्हार आयटीआय- टाटा पॉवर
* कर्जत आयटीआय- रुस्तमजी समूह ’ पनवेल आयटीआय- महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल ’ वानगाव आयटीआय- जेएसडब्ल्यू लिमिटेड ’ नागोठाणे आयटीआय- इस्पात ’ ओरस आयटीआय, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स ’ मुंबई आयटीआय- एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स ’ कुर्ला आयटीआय- गोदरेज ’ जामनेर आयटीआय- जैन इरिगेशन सिस्टिम्स ’ नेवासा आयटीआय- जीकेएन सिन्टर मेटल्स लिमिटेड, अहमदनगर ’ पंढरपूर आयटीआय- लक्ष्मी हायड्रॉलिक्स लिमिटेड, सोलापूर *  बदनापूर आयटीआय- आकृती सिटी गोल्ड इन्स्टिटय़ूट, मुंबई ’ देवरी आयटीआय- अशोक लेलँड ’ मोर्शी आयटीआय- इस्पात इंडस्ट्रीज, नागपूर ’ उमरखेड आयटीआय- रेमन्ड्स युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड ’ साकोली आयटीआय- अशोक लेलँड्स ’ बोरिवली आयटीआय- ओबरॉय हॉटेल अॅण्ड रिसॉर्ट्स, मुंबई ’ परांडा आयटीआय- व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज ’ अम्बड आयटीआय- एनआरबी बिअरिंग्ज लिमिटेड
* औंध, पुणे आयटीआय (मुलींची)- व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज
* इंदापूर आयटीआय- थर्मेक्स
० आयटीआयमधील अभ्यासक्रम :
* हॉस्पिटॅलिटी- या अभ्यासक्रमांतर्गत खाद्यपदार्थ निर्मिती (कुकरी), फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, खानपान सेवा, स्टीवर्डशिप या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. संस्था- आयटीआय-बोरिवली मुंबई/ श्रीवर्धन/ कर्जत/ पोलादपूर/ पन्हाळा/
नाशिक/ चिमूर.
* कन्स्ट्रक्शन अॅण्ड वूड वìकग- या अभ्यासांतर्गत काँक्रीट तंत्रज्ञान, आधुनिक बांधकाम तंत्र आणि व्यवस्थापन, फोम वर्क आणि बार बेंडिंग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
संस्था-आयटीआय- बेलापूर/ बदनापूर/ मालवण/ घाटंजी/ माणगाव.
* प्रॉडक्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चिरग- या अभ्यासांतर्गत सी.एन.सी. मशिनिंग, अॅडव्हान्स्ड वेल्डिंग/ मॅन्युफॅक्चिरग ऑफ जिग्ज अॅण्ड फिक्चर्स, टूल अॅण्ड डाय मेकर, क्वालिटी इंजिनीअरिंग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- श्रीगोंदा/ पंढरपूर/ धर्माबाद/ अहमदपूर/ सिंदेवाही/ शिरोळ/ संगमनेर/ घनसांगवी/ हातकलंगले.
* अॅपरेल- या अभ्यासांतर्गत शर्ट आणि पँट, फॅशन डिझायिनग आणि कॉम्प्युटर एडेड पॅटर्न मेकिंग अॅण्ड डिझायिनग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- सोलापूर/ जळगाव/ शिरपूर.
* इलेक्ट्रिकल- या अभ्यासांतर्गत विद्युत अभियांत्रिकीमध्ये उपयोगात येणाऱ्या उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती, घरगुती उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती, विद्युत यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती आणि देखभाल आणि वीज पुरवठा, उच्च दाब, कमी दाब आणि उपकेंद्रामध्ये कार्यरत उपकरणांची देखभाल आणि कार्यान्वयन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- तिरोडा/ मुरबाड/ हिंगणा/ भिवापूर/ पारशिवणी/ नरखेड/ समुद्रपूर/ मोहाडी/ अर्जुनी मोरगाव/ कुही/मौदा/ भद्रावती/ कोरगाव/ करमाळा/ मुलुंड/ गुहागर/ अहमदनगर/ भुसावळ/ गोंदिया/ पिंपळनेर/ जव्हार.
* इलेक्ट्रॉनिक्स- या अभ्यासांतर्गत रेडिओ, ऑडिओ, व्हिडीओ सिस्टिम अॅण्ड अप्लायन्सेस, कम्युनिकेशन सिस्टीम, इन्व्हर्टर, यूपीएस व्होल्टेज स्टॅबिलायजर्स आणि इंडस्ट्रिअल ड्राइव्ह्ज या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- नाशिक/ औंध, पुणे/ भंडारा.
* ऑटोमोबाइल– या अभ्यासांतर्गत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, डेटिंग, पेंटिंग अॅण्ड वेल्डिंग ऑफ ऑटोमोबाइल्स, ऑटो इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड एअरकंडिशिनग इन ऑटोमोबाइल या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- देवरी/ हिंगोली/ दिग्रज/ पवणी/ लाखांदूर/ मोखाडा.
* फॅब्रिकेशन- या अभ्यासांतर्गत वेल्डिंग इन्स्पेक्शन अॅण्ड टेस्टिंग, पाइप वेल्डिंग, स्ट्रक्चरल वेल्डिंग, मिग वेल्डिंग प्रेशर पार्ट्स फिटिंग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय-सांगोला/ पारनेर / भातकुली/ म्हसळा /आर्णी/ सेलू.
* रेफ्रिजरेशन अॅण्ड एअरकंडिशिनग- या आयटीआय अभ्यासाअंतर्गत डोमेस्टिक, कमíशअल, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअरकंडिशिनग, सेंट्रल एअरकंडिशिनग प्लांट, इंडस्ट्रिअल कूलिंग अॅण्ड पॅकेज, कोल्ड स्टोरेज, आइस प्लाँट अॅण्ड आइस कॅन्डी प्लाँट या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- चिमूर/ अंबरनाथ.
* इंडस्ट्रिअल फॅब्रिकेशन (फिटिंग अॅण्ड वेल्डिंग)- या अभ्यासांतर्गत वेल्डिंग इन्स्पेक्शन अॅण्ड टेस्टिंग, पाइप वेल्डिंग, स्ट्रक्चरल वेल्डिंग, मिंग वेल्डिंग प्रेशर पार्ट्स फिटिंग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- सिन्नर/ वसमतनगर.
* टेक्सटाइल प्रोसेसिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी- या अभ्यासाअंतर्गत अॅडव्हान्स्ड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी ऑफ सायजिंग, ब्लिचिंग अॅण्ड फिनिशिंग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
संस्था- आयटीआय- हातकलंगले.
*  केमिकल- या अभ्यासांतर्गत अटेंडंट ऑपरेटर, मेंटेनन्स मेकॅनिक, इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, लॅब असिस्टंट या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- नागोठणे/ महाड/ चिपळूण.
* इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी- या अभ्यासांतर्गत संगणक हार्डवेअरची दुरुस्ती, देखभाल, संगणक नेटवìकग, मल्टिमीडिआ आणि वेब पेज डिझायिनग या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय ठाणे/ नागपूर.
*  इंडस्ट्रिअल ऑटोमेशन- या अभ्यासांतर्गत इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स, ऑटोमेशन, मेकॅनिक मेन्टेनन्स फॉर आटोमेशन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या अभ्यासांतर्गत इंजेक्शन मोल्डिंग प्रोसेस, ब्लो मोल्डिंग प्रोसेस या विषयांचे प्रशिक्षण मिळते. संस्था- आयटीआय- मालेगाव (बुद्रुक).
* प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर- या अभ्यासांतर्गत इंजेक्शन मोल्डिंग प्रोसेस, ब्लो मोल्डिंग प्रोसेस या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्था- आयटीआय- जळगाव/ वाडा. प्रत्येकी
९६ विद्यार्थी/ विद्यार्थिनींना  प्रवेश दिला जातो.  (पूर्वार्ध)