20 October 2020

News Flash

विज्ञान-तंत्रज्ञानातील नवे पर्याय

विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखेतील नव्याने सुरू झालेल्या काही पदवी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती- गेल्या काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील अनेक नव्या पदवी अभ्यासक्रमांचे पर्याय विद्याथी-पालकांसमोर उपलब्ध झाले आहेत.

| June 14, 2014 01:01 am

विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखेतील नव्याने सुरू झालेल्या काही पदवी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती-
गेल्या काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील अनेक नव्या पदवी अभ्यासक्रमांचे पर्याय विद्याथी-पालकांसमोर उपलब्ध झाले आहेत. त्याविषयी..
पिलाणीस्थित बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स- या संस्थेने काही नामवंत संस्थांच्या सहकार्याने ऑफ कॅम्पस असे पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* बॅचलर इन ऑप्टोमेट्री- आठ सत्रांचा हा अभ्यासक्रम   चेन्नईस्थित एलाइट स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री, शंकरा नेत्रालय येथे तसेच हैदराबादच्या बौश्च अ‍ॅण्ड लॉब्म स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री, एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवला जातो.
* बॅचलर इन फिजिकल असिस्टंट- हा अभ्यासक्रम चैन्नईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ कॉर्डिओ व्हॅस्कुलर डिसीजेस, मद्रास मेडिकल मिशन येथे शिकवला जातो. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ जून २०१४. पत्ता- डीन, वर्क इंटिग्रेटेड लर्निग प्रोग्रॅम डिव्हिजन बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स, विद्याविहार कॅम्पस, पिलाणी- ३३३०३१. वेबसाइट- www.bits-pilani.ac.in/
wilp-admission, ईमेल- info@wilp.bits.pilani.ac.in
* दहावीनंतर अभियांत्रिकी – मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग या संस्थेने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- सहा वर्षे. हा अभ्यासक्रम सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये करता येतो. पत्ता- मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग कॅम्पस, भक्ती वेदांत स्वामी मार्ग, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६. अर्हता- दहावीमध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. वेबसाइट- www.nmims.edu
ईमेल- enquiry.mpstme@nmims.edu
हैदराबादस्थित राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजी या संस्थेने इंटिग्रेटेड बीटेक् अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- सहा वर्षे. संस्थेतील पाच टक्के जागा इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. हा अभ्यासक्रम केमिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, मेटॅलर्जिकल, मटेरिअल्स आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये करता येतो. अर्हता- दहावीमध्ये ७० टक्के गुण मिळणे आवश्यक. पत्ता- विंध्या, सी-४, आयआयटी-एच कॅम्पस, गाचीबावली, हैदराबाद- ५०००३२.
वेबसाइट- www.rgukt.in
ईमेल- admissions2014@rgukt.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ जून २०१४.
* महिंद्रा-इकोले सेंट्राले संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- महिंद्रा-इकोले सेंट्राले संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने पाच वर्षे कालावधीचे इंजिनीअरिंग इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग या शाखांमध्ये करता येतात. हे अभ्यासक्रम केल्यावर बीटेक- एमटेक ही पदवी हैदराबादस्थित जवाहरलाल टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमार्फत दिली जाते. पत्ता- महिंद्रा- इकोले सेंट्राले, सव्‍‌र्हे नंबर- ६२/१ए, बहादूरपल्ली, जीदिमेटिआ, हैदराबाद-५०००४३.
वेबसाइट-www.mahindraecolecentrale.edu.in
ईमेल-info@mahindraecolecentrale.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ७ जुलै २०१४.
* बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्रॅम इन डायलेसीस टेक्नॉलॉजी- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने डायलेसीस टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्रॅम इन डायलेसीस टेक्नॉलॉजी या नावाने ओळखला जातो. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम अपेक्स स्कूल ऑफ डायलेसीस टेक्नॉलॉजी, अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड, अपेक्स हाऊस, स्पीट्रा मोटर्स, लिंक रोडच्या बाजूला मालाड (पश्चिम) मुंबई येथे शिकवला जातो. पत्ता- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, मुंबई- ४०००८८. वेबसाइट- www.tiss.edu
ईमेल- pgadmission@tiss.edu
संस्थेने तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन डायलेसीस टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ – विद्यापीठाने मास्टर इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. याशिवाय मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ आर्ट्स इन मास मीडिआ हे पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०१४ आहे. पत्ता- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी, नांदेड- ४३१६०६.
    वेबसाइट- www.srtmun.ac.in
* बीएस्सी इन अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी- वसंतराव नाईक कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी- यवतमाळ, विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, लातूर.
* बीटेक् इन अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग- कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, दापोली, जिल्हा-रत्नागिरी- ४१५७१२ (प्रवेशजागा- ६४), कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, परभणी- ४१३४०२ (प्रवेशजागा- ६४), कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, परभणी- ४१३४०२ (प्रवेशजागा- ५५), कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा- अहमदनगर (प्रवेशजागा- ६४)
* बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स- कालावधी- साडेपाच वर्षे. एसडीएम कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स या संस्थेने सुरू केला आहे. संस्थेची स्थापना १९८९ साली करण्यात आली. ही संस्था कर्नाटकातील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सशी संलग्न आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण. पत्ता- एसडीएम कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स, उजिरे- ५७४२४०, दक्षिण कन्नड, कर्नाटक. वेबसाइट- www.sdmbnys.in
    ईमेल- sdmcnys@gmail.com
* बीएस्सी इन इमर्जन्सी अ‍ॅण्ड ट्रॉमा केअर टेक्नालॉजी- श्री रामचंद्र युनिव्हर्सिटीने स्पोर्ट्स या संस्थेने पुढील वेगळे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कालावधी – चार वर्षे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी गंभीररीत्या जखमी अथवा आजारी व्यक्तीला तात्काळ सेवा आणि उपाययोजना पुरवण्याचे कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या क्षेत्रातील तंत्रज्ञांना सर्वसाधारणत: रुग्णवाहिका सेवा, जोखमीची शक्यता असलेले उद्योग आणि देश-विदेशातील मोठय़ा रुग्णालयांच्या क्रिटिकेल केअर युनिटमध्ये करियरची संधी मिळू शकते. या संस्थेने एम.एस्सी इन इर्मजन्सी अ‍ॅण्ड ट्रॉमा केअर टेक्नालॉजी हा दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर पदवीस्तरीय अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला आहे.
* बीएस्सी इन बायोमेडिकल सायन्स- या आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे. संशोधन, उच्च शिक्षण आणि स्पेशलाइज्ड प्रयोगशाळांमध्ये या तज्ज्ञांना करिअरच्या संधी मिळू शकतात. या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांमध्ये ह्य़ुमन जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स यांपैकी एका विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते.
* एमएस्सी इन बायोइन्फर्मेटिक्स- या अभ्यासक्रमात औषध आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालण्यात आली आहे.  
पत्ता- श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी, पोरुर, चेन्नई- ६००११६.
ईमेल-registrar@shriramchandra.edu.in
वेबसाइट- www.shriramchandra.edu.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: new options for career in science and technology
Next Stories
1 ‘बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ विषयक वैशिष्टय़पूर्ण पदवी अभ्यासक्रम
2 सांख्यिकी क्षेत्रातील करिअर
3 अनुवाद क्षेत्रातील संधी
Just Now!
X