देशभरातील काही शिक्षणसंस्थांनी सुरू केलेल्या एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
देशातील काही शैक्षणिक संस्थांनी बारावीनंतरचे एकात्मिक (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचे आहेत. यापैकी काही अभ्यासक्रमांना ‘डय़ुएल डिग्री’ या नावाने संबांधले जाते. याचा अर्थ एकाच वेळी दोन पदव्या प्राप्त होतात. काही इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांमध्ये आणि डय़ुएल डिग्री अभ्यासक्रमांमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यातून बाहेर पडण्याची संधी दिली जाते. इंटिग्रेटेड वा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम हे सध्या कला, वाणिज्य, विधी विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शाखेत सुरू करण्यात आले आहेत. बारावीनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीपर्यंत इतर पर्यायांचा विचार करण्याची तशी गरज नसते.
विज्ञान शाखा
* अम्रिता विश्वविद्यापीठम- ६ इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन केमिस्ट्री ६ इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन फिजिक्स ६ इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स. या सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत सरासरीने ५५ टक्के गुण आणि केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स या सर्व विषयांमध्ये प्रत्येकी ५० टक्के मिळणे आवश्यक.
* पाँडिचेरी युनिव्हर्सिटी- एम.एस्सी. इन केमिस्ट्री,
एम.एस्सी. इन फिजिक्स, एम.एस्सी. इन स्टॅटिस्टिक्स, एम.एस्सी. इन कॉम्प्युटर सायन्स, एम.एस्सी. इन अॅप्लाइड जिऑलॉजी, एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक्स.
* गुरू घसिदास युनिव्हर्सिटी- एम.एस्सी. इन फॉरेन्सिक सायन्स, एम.एस्सी. इन बॉटनी, एम.एस्सी. इन केमिस्ट्री, एम.एस्सी. इन फिजिक्स, एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक्स, एम.एस्सी. इन झुऑलॉजी, एम.एस्सी. इन कॉम्प्युटर सायन्स, एम.एस्सी. इन इलेक्ट्रॉनिक्स, एम.एस्सी. इन रुरल टेक्नॉलॉजी.
* युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद- एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक सायन्स, एम.एस्सी. इन फिजिक्स, एम.एस्सी. इन केमिकल सायन्स, एम.एस्सी. इन सिस्टीम बायोलॉजी, एम.एस्सी. इन हेल्थ सायकॉलॉजी, एम.एस्सी. इन ऑप्टोमेट्री अॅण्ड व्हिजन सायन्स.
* डून युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बीसीए / एमसीए, अर्हता- गणित विषयासह ५० टक्के गुणांसह बारावी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते.
अभियांत्रिकी शाखा
* मोदी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी- इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.बी.ए. इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.बी.ए. इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
* गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी- बी.टेक्. अॅण्ड एम.टेक. डय़ुएल डिग्री इन बायोटेक्नॉलॉजी.
* हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स –
O बी.टेक.- एम.टी.एम. (मास्टर ऑफ मॅनेजमेंट) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग. कालावधी- साडेपाच वर्षे.
O इंटिग्रेटेड एम.टेक. इन सिव्हिल इंजिनीअरिंग (कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट).
* वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन बायोटेक्नॉलॉजी (हा अभ्यासक्रम वेल्लोर कॅम्पसमध्ये शिकवला जातो.), इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग (हा अभ्यासक्रम वेल्लोर आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकवला जातो.).
* जेईसीआरसी युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री- बी.टेक.- एम.बी.ए.
* पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी- एम.टेक. इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी.
* श्रद्धा युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.टेक. आणि इंटिग्रेटेड बी.टेक. अॅण्ड एम.बी.ए.
* अॅमिटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी- डय़ुएल डिग्री- बी.टेक. अॅण्ड एम.बी.ए. (बी.टेक. सिव्हिल इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग), बी.टेक. अॅण्ड एम.टेक. (मेकॅनिकल अॅण्ड ऑटोमेशन आणि ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग).
* लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- (डय़ुएल डिग्री) बी.टेक.- एम.बी.ए. आणि बी.टेक.- एम.टेक.
* ज्ञानविहार युनिव्हर्सिटी- बी.टेक. + एम.टेक. डय़ुएल डिग्री आणि बी.टेक. + एम.बी.ए. डय़ुएल डिग्री.
* वेल टेक युनिव्हर्सिटी- बी.टेक. वुइथ एम.बी.ए.
* देवी अहिल्या विश्वविद्यालय- १) मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन. कालावधी- सहा वर्षे २) एम.टेक. इन आय. टी. कालावधी- साडेपाच वर्षे.
* कलिंगा इन्स्टिटय़ूट ऑफ इण्डस्ट्रियल टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी- बी.टेक. अॅण्ड एम.टेक. डय़ुएल डिग्री इन (सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल- ऑटोमोबाइल), बी.टेक. अॅण्ड एम.बी.ए. डय़ुएल डिग्री.
* गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री- बी.टेक. + एम.टेक./ एम.बी.ए. इन (फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी).
* गाल्गॉटिअॅस युनिव्हर्सिटी- बी.टेक. + ए.एम.बी.,
* मदुराई कामराज युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बी.टेक.- एम.टेक. इन फिल्म इलेक्ट्रॉनिक मीडिआ स्टडीज.
व्यवस्थापन शाखा
* जेम्स बी स्कूल- इंटिग्रेटेड बी.बी.ए. अॅण्ड एम.बी.ए.
* वेल्स युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड एम.बी.ए.
* डून युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बी.बी.ए./ एम.बी.ए., अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२वी.
* फूटवेअर डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट- बी.बी.ए. + एम.बी.ए.
* श्रद्धा युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बी.बी.ए. अॅण्ड एम.बी.ए.
* ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी- या युनिव्हर्सिटी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूलने बी.बी.ए.- एम.बी.ए. हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रवेशजागा- १२० विद्यार्थी. अर्हता- कोणत्याही शाखेतील ७० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण.
* देवी अहिल्या विश्वविद्यालय- एम.बी.ए. इन मॅनेजमेंट सायन्स ६ एम.बी.ए. इन फॉरेन ट्रेड एम.बी.ए. इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन.
* मदुराई कामराज युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड बी.बी.ए.-एम.बी.ए. इन टुरिझम अॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट
* भारतीयार युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड एमबीए.
* गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी- बी.बी.ए.- एम.बी.ए.
* गाल्गॉटिअॅस युनिव्हर्सिटी- बी.बी.ए.- एम.बीए.
* श्री गुरु गोबिंद सिंग ट्रायसेन्टेनरी युनिव्हर्सिटी- बी.बी.ए.- एम.बी.ए.
डिझायनिंग
जी डी गोयंका युनिव्हर्सिटी- बी.एस्सी.- एम.एस्सी. इन डिझाइन (स्पेशलायझेशन इन कम्युनिकेशन डिझाइन, फॅशन डिझाइन, जेमॉलॉजी अॅण्ड ज्वेलरी डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन)
रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, म्हैसूर- नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग, नवी दिल्लीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेतील अभ्यासक्रम- ६ एम.एस्सी. अॅण्ड बी.एड. इन फिजिक्स ६ एम.एस्सी. अॅण्ड बी.एड. इन केमिस्ट्री ६ एम.एस्सी. अॅण्ड बी.एड. इन मॅथमॅटिक्स. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत. या अभ्यासक्रमांना बारावी परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा वर्षे. (१२ सत्रे)
ई-मेल- riemysore@rediffmail.com