जैवतंत्रज्ञान विषयाचा आवाका वाढत आहे आणि त्यानुसार संबंधित विषयशाखांमध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. देशभरातील जैवतंत्रज्ञान विषयक विविध अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख-

जैवतंत्रज्ञान हा विषय जिवंत प्राणी, पेशी, वनस्पती आणि जैवप्रक्रिया यांच्याशी संबंधित आहे. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या साहाय्याने जैविक पेशींच्या रहस्याचा शोध लावण्यात या शास्त्राचा मोठा हातभार आहे.
जैवतंत्रज्ञानाच्या विषयाचा आवाका मोठा असून त्यात अनुवंशशास्त्र (जेनेटिक्स), रेणीव (मॉलिक्युलर) जीवशास्त्र, जैव-रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, विषाणूशास्त्र, इम्युनॉलॉजी यासारख्या विषयांचा अंतर्भाव होतो. जैवतंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीचा लाभ आरोग्य, कृषी, फलोत्पादन, पशुपालन या क्षेत्रांतील संशोधन आणि विकास प्रक्रियेदरम्यान होतो. याशिवाय अन्न प्रक्रिया, रसायन अभियांत्रिकी, ड्रग डिझायिनग आणि निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन याही क्षेत्रांत या शास्त्राचा उपयोग केला जातो.
आपल्या देशातील वैद्यकीय जैवतंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. देशातील ७० ते ८० टक्केजैवतंत्रज्ञान क्षेत्रातील महसूल या क्षेत्राद्वारे मिळतो. कृषी जैवतंत्रज्ञान, जैवखते आणि जैव कीटकनाशके निर्मिती या क्षेत्रांचीही वाढ होत आहे. औषधनिर्माण उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची निर्मिती करणारे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र हे क्षेत्रही वेगाने विकसित होताना दिसते.
जैवतंत्रान विषयाचा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयाचा पाया पक्का असणे आवश्यक आहे. बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषय घेतलेले विद्यार्थी जैवतंत्रज्ञान विषयात बीएस्सी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला आहे.
जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्था-
* इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फम्रेटिक्स अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी- पुणे विद्यापीठ.
= इंटिग्रेटेड एमएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी- पाच वर्षे.
= इंटिग्रेटेड एम.टेक इन बायोटेक्नॉलॉजी- सहा वर्षे.
पत्ता- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशिखड रोड,
पुणे- ४११००७. वेबसाइट- http://www.unipune.ac.in
* डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ.
= एमएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी
= पीएच.डी इन बायोटेक्नॉलॉजी.
वेबसाइट- http://www.mu.ac.in
* राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नागपूर विद्यापीठ.
एमएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी. पत्ता- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर- ४४०००३३.
वेबसाइट- http://www.rgbc.org.in
ईमेल- director.rgbc@gmail.com
* बायोइन्फम्रेटिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया :
= बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी : अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे.
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोटेक्नॉलॉजी:
अर्हता- बीएस्सी-बायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोइन्फम्रेटिक्स/ नìसग. कालावधी- एक वर्ष.
= मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी : अर्हता- बीएस्सी- बायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोइन्फम्रेटिक्स/ नìसग. कालावधी- दोन वष्रे.
पत्ता- एच- १०९, सेक्टर ६३, नॉयडा- २०१३०७.
वेबसाइट- http://www.bii.in ईमेल : info@bii.in
* इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फम्रेटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड बायोटेक्नॉलॉजी :
= एमएस्सी इन बायोइन्फम्रेटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड बायोटेक्नॉलॉजी. अर्हता- केमिस्ट्री/ फिजिक्स/ लाइफ सायन्स/ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/ बायोटेक्नॉलॉजी विषयातील बीएस्सी/ बीटेक-बायोटेक्नॉलॉजी/ एमबीबीएस/ बीडीएस/ बी. फार्म. ऑनलाइन चाचणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो.
पत्ता- बंगळुरू बायोटेक पार्क, बेंगळरू.
वेबसाइट- http://www.ibab.ac.in
ईमेल- info@ibab.ac.in
* फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड सायन्स, दिल्ली विद्यापीठ :
= एम.एस्सी इन प्लान्ट मॉलिक्युलर बायोलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी. उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. कालावधी- दोन वष्रे.
= एम.फिल आणि पीएच.डी इन प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी फॉर ह्युमन हेल्थ- पत्ता- युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली,
न्यू दिल्ली- १००००७. वेबसाइट- http://www.du.ac.in
* अ‍ॅकेडमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेिनग युनिव्हर्सटिी-
= एमएस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- जैविक शास्त्राच्या कोणत्याही शाखेतील बीएस्सी. निवड प्रवेशपरीक्षेद्वारे केली जाते.
= एम.फिल इन मरिन बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- १३२, इस्ट कोस्ट, कांथूर, चेन्नई- ६०३११२.
ईमेल- office@ametuniv.ac.in
वेबसाइट- http://www.ametuniv.ac.in
* अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी : बी.एस्सी (ऑनर्स)- बायोटेक्नॉलॉजी, बी.एस्सी (ऑनर्स)- मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, बी.एस्सी अ‍ॅण्ड एमएस्सी- बायोटेक्नॉलॉजी (डय़ुएल डिग्री), बी.टेक अ‍ॅण्ड एमटेक- बायोटेक्नॉलॉजी (डय़ुएल डिग्री), बी.टेक- बायोटेक्नॉलॉजी (डय़ुएल डिग्री), एमएस्सी- बायोटेक्नॉलॉजी, एम.टेक- बायोटेक्नॉलॉजी, एमबीए- बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, पीएच.डी- बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- जे-३ ब्लॉक, अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी कॅम्पस,
सेक्टर-१२५, नॉयडा- २०१३०३.
वेबसाइट- http://www.amity.edu
* पुढील अभियांत्रिकी महाविद्यालयांत बीटेक-बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रम शिकता येईल-
= प्रियदर्शनी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग, मौजा शिवणगाव, नागपूर- ४४००१९.
= तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर.
= कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कोल्हापूर.
= जवाहरलाल नेहरू इंजिनीअिरग कॉलेज, औरंगाबाद.
= कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, जळगाव.
= एसआयईएस, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरुळ.
= थडोमल शहाणी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग.
वांद्रे, मुंबई.
= एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कामोठे, नवी मुंबई.
नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट
हे अभ्यासक्रम एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट
स्टडीजने सुरू केले आहेत.
अर्हता- ५० टक्के गुणांसह औषधीनिर्माणशास्त्र किंवा
जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र या विषयातील पदवी.
कालावधी- एक वर्ष.
पत्ता- श्री चंद्रासेकारेनंद्रा सरस्वती विद्यापुरम, सेक्टर- ५,
नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६.
वेबसाइट- http://www.siescoms.edu
ईमेल- admissions.siescoms@sies.edu
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

accurate rainfall forecast not possible
पावसाचा अंदाज का चुकतो? हवामानातील वैविध्य, अपुरे तंत्रज्ञान यामुळे मर्यादा
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- पर्यावरण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भूगोल (सामान्य अध्ययन)
mp supriya sule comment on growing variety of reels
सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य… म्हणाल्या, पाच मिनिटे…
How many registrations for Technical Diploma Course this year
तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा किती नोंदणी… कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Mpsc Mantra Gazetted Civil Services Joint Prelims Common
Mpsc मंत्र: राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासामान्य विज्ञान
Preparation for mpsc Geography Main Exam mpsc exam
mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)
MHT-CET, MHT-CET result,
एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणवाढीमुळे ‘या’ शाखांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढणार; अशी आहे राज्यातील प्रवेशाची स्थिती