संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या वारक ऱ्यांसाठी वोडाफोन कंपनीतर्फे मोफत मोबाईल सेवा देणाऱ्या व्हॅनची सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा पुण्यापासून पंढरपूपर्यंत असेल.
वारक ऱ्यांना दिंडी दरम्यान घरचे, नातेवाईक, संबंधित लोकांना फोन करून सतत माहिती द्यावी लागते. काही वेळा मोबाईलला रेंज नसणे, मोबाईलमधील पैसे संपणे यासारख्या अडचणी येत असतात. त्यामुळे वोडाफोन बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वारक ऱ्यांना संबंधितांना मोफत फोन करता येणार आहे. तसेच मोबाईल चार्जिग करणे, मोबाईलमध्ये काही अडचणी असल्यास त्या सोडवणे, आदी सेवाही याद्वारे दिली जाणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत प्रत्येकी दोन व्हॅन असतील.

Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?