विविध समारंभांसाठी तसेच व्यावसायिक आवश्यकतेपोटी विविध प्रकारच्या मेकअप व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. हे क्षेत्र सृजनशीलतेला सतत आव्हान देणारे आहे. यात कलात्मकतेची कसोटी लागते. हे आव्हान पेलू इच्छिणारे मेकअप आर्टिस्ट निश्चितपणे या व्यवसायात जम बसवू शकतात. मेकअप, हेअर स्टाइल वा ग्रूमिंगसारख्या वेगवेगळ्या कौशल्यानुसार मेकअप आर्टिस्टची बिदागी ठरत असते. प्रशिक्षित आणि अनुभवी मेकअप आर्टिस्टला चांगला मोबदला प्राप्त होऊ शकतो.
करिअरच्या संधी
मेकअप आर्टिस्ट होण्याकरता दर्जेदार प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक असते. मात्र, प्रशिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर आघाडीच्या व्यावसायिकाकडे उमेदवारी करणे केव्हाही उत्तम. कामाच्या सरावाने आणि तेथे मिळालेल्या अनुभवाने मेकअप आर्टिस्टचे कौशल्य अधिक दुणावते. त्यामुळेच उमेदवारांनी सुरुवातीला कमी मानधनातही काम करण्याची तयारी ठेवायला हवी. हळुहळु तुमच्या कामाची दखल ग्राहकवर्ग जसजसा घेईल, तसतशी तुमच्याकडे येणाऱ्या कामाची संख्या वाढू शकते आणि तुमचा स्वत:चा असा ग्राहकवर्ग तयार होतो.
मात्र, मेकअप आर्टिस्ट होण्याचे निश्चित केल्यानंतर सर्वात आधी दर्जेदार प्रशिक्षण संस्था निवडणे महत्त्वाचे ठरते. प्रशिक्षण संस्था निवडताना उत्तम प्रशिक्षक, वेगवेगळ्या स्टाइल्सचे प्रशिक्षण हे निकष लक्षात घ्यावेत. जर या क्षेत्राकडे तुम्ही करिअर म्हणून बघत असाल तर एखाद्या महिन्याभराचा प्रशिक्षणक्रम करण्यापेक्षा दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम करणे उत्तम. दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमातून मेकअप आणि स्टाइल्स संदर्भातील इत्यंभूत माहिती तुम्हांला मिळू शकते, त्याचप्रमाणे काही प्रशिक्षण संस्था तुम्हांला या अभ्यासक्रमाअंती कामाचा अनुभवही मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यातून पुढे कामाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आपल्या सेवेचा आणि कलात्मकतेचा दर्जा राखल्यास मेकअप आर्टिस्ट उत्तम करिअर
करू शकतात.
नामांकित ब्रँडच्या स्टाइल सलून्समध्ये संधी मिळण्यासोबत दूरचित्रवाणी वा चित्रपटांसारख्या विविध माध्यमांतही मेकअप आर्टिस्टना संधी मिळू शकते.
ब्रायडल मेकअपचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
* लॅक्मे अकादमी- या संस्थेचा अभ्यासक्रम – फाऊंडेशन इन मेक अप. कालावधी- पाच आठवडे.
वेबसाईट- http://www.lakmetrainigacademy.com
* नलिनी अँड यास्मिन एज्युकेशन
या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम घेतले जातात-
* प्रोफेशनल मेकअप अँड हेअर स्टायलिंग. कालावधी चार आठवडे.
* पर्सनल मेकअप अँड हेअर स्टायलिंग. कालावधी तीन दिवस.
* ब्युटी बेसिक्स. कालावधी सहा आठवडे. पत्ता- भोलेनाथ प्लाझा, सीटीएस १२३८, गुरुनानक रोड, वांद्रे तलावाजवळ, वांद्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५०.
मेल-education@nalini.in वेबसाईट- http://www.nalini.in
* व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट
या संस्थेचा अभ्यासक्रम- आर्ट ऑफ मेकअप आणि प्रोफेशनल मेकअप.
पत्ता- * माधवकुंज अपार्टमेंट ए विंग, २७० पहिला मजला, एसव्ही रोड, बोरिवली पश्चिम मुंबई- ४०००९२.
ईमेल- institute3.mum@vlccwelness.com.
* दुसरा मजला, मोनोप्लेक्स प्लाझा, सीटीएस, नंबर- १०२०/७, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे- ४१२२०८१६. वेबसाइट- http://www.vlccinstitute.com
मेल – vlccinstitue@vlcc.co.in
* ब्युटिक- या संस्थेचा अभ्यासक्रम- नववधू मेकअप वर्कशॉप (कालावधी-१० दिवस), पत्ता- ब्युटिक इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी थेरपी अँड हेअर ड्रेसिंग, १०९, न्यू उद्योग मंदिर गेट, नंबर २, ८ सी, मोगल लेन, माहीम, मुंबई.
मेल- mayabutic@gmail.com
* स्नेल हंस इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्युटी, हेअर ड्रेसिंग अँड कॉस्मेटोलॉजी
या संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशन मेकअप, पत्ता- नेपिअन-सी मार्ग, मुंबई- ३६.
वेबसाइट- http://www.rbcsgroup.com http://www.schnellhancs.com
ईमेल- schnellhacs@rbcscgroup.com
* इंटरनॅशनल स्कूल ऑफ अॅस्थेटिक्स अॅण्ड स्पा
या संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* अॅडव्हान्स्ड मेकअप कोर्स
* सर्टिफिकेट मेकअप कोर्स पत्ता- १०४/ १०५, ग्रीन्स नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क, पुणे- ४११००१.
ईमेल- info@isas-pune.com
* एनरिच
या संस्थेने फाऊंडेशन मेकअप आर्टिस्ट्री, ब्रायडल आणि ग्रूम मेकअप, कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकअप आर्टिस्ट्री, पर्सनल मेकअप अॅण्ड हेअर स्टायलिंग हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पत्ता- ग्रँड रेसिडन्सी हॉटेल्स अॅण्ड सव्र्हिस अपार्टमेंट जंक्शन, २४ आणि २९ वा रस्ता, वांद्रे (पश्चिम), मुंबई.
वेबसाईट- http://www.enrichsalon.com
ईमेल- education@enrichsalon.com.
* इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी
या संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
* सर्टिफिकेट इन प्रोफेशनल मेकअप
* सर्टिफिकेट इन नेल आर्ट
* सर्टिफिकेट इन अॅडव्हान्स्ड नेल आर्ट
* सर्टिफिकेट इन डे अॅण्ड नाइट मेकअप
* सर्टिफिकेट इन ब्रायडल मेकअप
पत्ता- इंडो- कॅनेडियन नॅशनल अकादमी, ३३, ३४ कार्तिक कॉम्प्लेक्स, सिटी मॉलसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई. मेल- icnaberkowits@gmail.com
वेबसाईट- http://www.icna.in
* क्रस्टाई वाल्मी इंटरनॅशनल अॅकॅडेमी
अभ्यासक्रम – मेकअप कोर्स.
पत्ता- * मुंबई- सहावा मजला, टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मुंबई- ४०००३८.
ईमेल- info@christinevalmyindia.com
* पुणे- पहिला मजला, १३२० शिवाजी नगर, रिलायन्स ज्वेल्सच्या बाजूला, जे. एम. रोड, पुणे- ४११००५.
ईमेल- info@cypune.com.
वेबसाइट- www. christinevalmyindia.com
* मेकअप स्टुडिओ ट्रेनिंग सेंटर
या संस्थेने कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकअप आर्टिस्ट डिप्लोमा, अॅडव्हान्स्ड मेकअप आर्टिस्ट्री, ब्युटिमेक, अंडरस्टँडिंग मेकअप हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
पत्ता- कामधेनू इमारत क्रमांक ४, फ्लॅट नंबर- १०६, पहिला मजला, लोखंडवाला अंधेरी- पश्चिम, मुंबई- ४०००५३.
वेबसाइट- http://www.makeupstudio.in.
ईमेल- mumbai@makeupstudio.in
* एलटीए स्कूल ऑफ ब्युटी
या संस्थेने प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रोग्राम, ब्रायडल मेकअप हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ब्रायडल मेकअप या अभ्यासक्रमात साडी परिधान करण्याचे तंत्र, दिवसाचा आणि संध्याकाळचा मेकअप, रंगसंगतीचे तंत्र यासारख्या विषयांचा समावेश आहे. पत्ता- ए १०२, प्रार्थना स्टार, स्वामी नित्यानंद मार्ग, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५४.
वेबसाइट- http://www.ltaschoolbeauty.com
* कपिल सलून अॅण्ड ब्युटी
या संस्थेने प्रोफेशनल मेकअप कोर्स, प्रोफेशनल फॅशन मेकअप हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पत्ता- १०३, पहिला मजला, लक्ष्मीव्हिला, काळा हनुमान मंदिराच्या विरुद्ध दिशेला, एम. जी. रोड कांदिवली पश्चिम, मुंबई- ४०००६७.
वेबसाइट- http://www.kapilssalon.com
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2014 रोजी प्रकाशित
मेकअप आर्टिस्ट
विविध समारंभांसाठी तसेच व्यावसायिक आवश्यकतेपोटी विविध प्रकारच्या मेकअप व्यावसायिकांना मोठी मागणी आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 26-05-2014 at 01:59 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way of success makeup artist