नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम शाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. ती चुक तुम्ही करू नका’ अशा आशयाचा फलक घेऊन संत तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत. ‘मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकड़े लक्ष द्या’ अशी एकच हाक दिंडीतील मुलांकडून ऐकण्यास मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक येथील आधारतीर्थ आश्रममध्ये राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. तेथील मुलांची दिंडी आळंदी ते पंढरपूर या दरम्यान असून या दिंडीचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये वयोगट ५ ते १५ वर्षापर्यंतची ५० मुले सहभागी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, आत्महत्या हा पर्याय नाही, असा संदेश असलेल्या टोप्या त्या विद्यार्थ्यांनी घातल्या होत्या. उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

मराठीतील सर्व वारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide farmers children in dindi from alandi to pandharpur awakening to farmers
First published on: 18-06-2017 at 19:13 IST