वसई – नणंदेचा गर्भपात व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सहाय्याने जादुटोणा केल्याचा प्रकार विरारच्या ग्रामीण भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी महिलेसह मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विरार पूर्वेच्या काशिद गावात राहणारी एक महिला गर्भवती होती. मात्र तिचे बाळ पोटात असताना गर्भपात व्हावा यासाठी तिच्या वहिनीने एका तांत्रिकाची मदत घेतली होती. त्या तांत्रिकाला तिने ४ हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवून अघोरी विद्या करण्यास सांगितले होते. तिच्या मोबाईलमधील हे संदेश तिचा पती हेमंत कुडू याला दिसला. त्याने या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिला सपना कुडू (३३) तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – ‘कार्यालयात येऊन फटकावेन..!’ हितेंद्र ठाकूर यांची वसई पालिका आयुक्तांना दमदाटी

हेही वाचा – अपघात विमा योजनेवरील बाळासाहेबांचे नाव ‘गायब’; महायुती सरकारला शिवसेनाप्रमुखांचा विसर, ठाकरे गटाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी महिलेच्या पतीला पत्नीच्या मोबाईलमध्ये संभाषण, संदेश आढळले होते. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मोबाईलमधील आवाज (वॉईस रेकॉर्डींग) आरोपी महिलेचाच आहे का त्याची आम्ही पडताळणी करत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.