सुहास बिऱ्हाडे

वसई : राज्यात लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी कुठेलही अनुदान दिले जात नसल्याने कोणत्याही शासकीय योजनेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयांत लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे या शस्त्रक्रियांची सर्वाधिक गरज असलेल्या तृतीयपंथीयांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

लिंगबदल शस्त्रक्रियेआधी समुपदेशन आवश्यक असते. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरही उपचारांची गरज असते. यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो आणि संपूर्ण प्रक्रियेचा खर्च ३ ते ५ लाखांच्या घरात जातो. या शस्त्रक्रियांना अद्याप अनुदान नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना किंवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांतच या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.

हेही वाचा >>>शहरातील वाहतूक कोंडी सुटणार, वसई विरार शहरातील १२ उड्डाणपूलांचा मार्ग मोकळा

दोन वर्षांपूर्वी लिंगबदल शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट केल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे सामाजिक कार्यकर्त्यां प्रिया पाटील यांनी सांगितले. अन्य राज्यांत लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते. तसे अनुदान महाराष्ट्रातही मिळावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां दिशा पिंकी शेख यांनी केली. लिंगबदल शस्त्रक्रियेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामधून अवयव प्रत्यारोपण श्रेणीचे निकष लावून मदत देण्यात यावी अशी मागणी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली.

हेही वाचा >>>जितेंद्र आव्हाडांवर भाईंदरमध्येही गुन्हा दाखल

अशी होते शस्त्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • लिंगबदलाचे उपचार वल्र्ड प्रोफेशनल असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थच्या (डब्ल्यू पॅथ) मानकांनुसार केले जातात.
  • या पूर्ण प्रक्रियेत मानसिक चाचणी महत्त्वाची असते. तृतीयपंथीयाचे वागणे विरुद्धिलगी व्यक्तीसारखे असते. वैद्यकीय भाषेत अशा व्यक्तीला ‘जेंडर डिस्फोरिया’ म्हणतात.
  • मानसिक चाचणीत ‘जेंडर डिस्फोरिया’ झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर पुढील उपचार सुरू होतात.

लिंगबदल शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि गुंतागुतीची असते. अशा शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शिका (मॅन्युअल) तयार करायला हवी.- प्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां