नागरिकांची गैरसोय; १० कोटी देऊनही पालिकेकडून दुरुस्ती नाही

वसई: गुजरात गॅस कंपनीतर्फे वसई विरार शहरात पाइपलाइन करण्याचं काम जोरात सुरू आहे. मात्र हे काम करताना ठिकठिकाणी रस्ता खणण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत आहे. गुजरात गॅस कंपनीने महापालिकेला या कामाचे दहा कोटी रुपये अदा केले आहे. मात्र अद्याप पालिकेने डागडुजीचे काम सुरू केलेले नाही.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

नागरिकांना घरगुती गॅस लवकर मिळावा यासाठी टप्प्याटप्प्याने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वसई विरार शहरात ८ इंच व्यासाच्या २३० किलोमीटर लांबीच्या गॅस वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत.पहिल्या टप्प्यात २६ किलोमीटर लांबीच्या गॅसवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी खोदकाम करम्णे आणि पुन्हा खोदलेली जमीन पूर्ववत करावी लागणार आहे. या कामासाठी पालिकेने प्रति मीटरचा ३ हजार ७२९ रुपये एवढे शुल्क आकारले आहे. नवीन दराप्रमाणे ९ कोटी ७७ लाख रुपये आणि भूभाडे (प्रति मीटर ५ रुपये) यानुसार २६ लाख रुपये असे एकत्रितपणे १० कोटी ३ लाख रुपये गुजराथ गॅसने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिप (६.५ किलोमीटर), वसई पश्चिमेकडील राजहंस (३.७ किलोमीटर) तसेच वसई पूर्वेच्या एव्हरशाइन सिटी आणि वसंत नगरी येथे (२६.२ किलोमीटर)  येथे अंथरण्यात येत आहे. ठेकेदारांनी काम करताना संरक्षक जाळय़ा  ठरावीक ठिकाणीच लावल्या आहेत. खड्डे खणल्यानंतर त्याची माती तशीच ररस्त्याच्या कडेला ठेवली जात आहे. यामुळे संपूर्ण रस्त्यावर  माती पसरून रस्ते निसरडे होत आहेत. यामुळे अपघातांची भीती वाढली आहे.   खोदकामात जलवाहिनी फुटून लिटर पाणी वाया जात आहे.गॅस पाइपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अनेकवेळा विनवण्या करूनही त्याच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे पालिकेने ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  इमारतीच्या बाहेर पडणेसुद्धा मुश्कील झाले आहे, अशी तक्रार वसंतनगर येथील नागरिक प्रवीण कुळे यांनी केली आहे.  सहा महिने उलटूनही रस्ता त्याच अवस्थेत आहे.

करारानुसार गुजराथ गॅस कंपनीने महापालिकेला दहा कोटी रुपये अदा केले आहेत. गॅस वाहिन्या अंथरल्यानंतर खणलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी आम्ही ठेकेदारांची नियुक्त केली आहे. मात्र हे काम टप्प्याटप्प्याने करायचे आहे. गॅस कंपनीचे काम पूर्ण झाले नसल्याने सध्या रस्ता पूर्ववत करता येणार नाही.

राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका