वसई: नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे
शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष भवनच्या कारगिल नाल्याजवळ क्षुल्लक वादातून दोन गटांत मारामारी झाली. या मारहाणीत आकाश पाल याचा जागीच मृत्यू झाला आहे तर शुभम ठाकूर आणि सलीम यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांना वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा – मुलीच्या सतर्कतेमुळे अतिप्रसंग टळला; काशिमिरा मधील घटना
या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांविरोधात हत्या, आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.