भाईंदर: देशात राहुल गांधीची लोकप्रियता वाढत आहे. याच गोष्टीची भीती मनात धरून भाजप गांधींचा देशभर विरोध करत आहे. खरंतर गांधींना विरोध ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती आहे, असे प्रतिपादन काँग्रेस विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाईंदर मध्ये काँग्रेस पक्षाचा कोकण विभागीय मेळावा पार पडला. त्यावेळी ते उपस्थितीत होते. या प्रसंगी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि अन्य विषयांवर भाष्य करीत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा : राहुल गांधींना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस – नाना पटोले
नितेश राणेला वरिष्ठांचे आदेश
आमदार नितेश राणे हे सातत्याने सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. राणे हे फार छोटे आहेत. मात्र त्यांच्या मागे एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला राज्यात दंगली घडून सत्ता मिळवायची आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी केले.