वसई : कांदळवन संरक्षण करण्याच्या दृष्टीने आता वसई, विरार शहरात महसूल विभागाच्या अखत्यारीत येणारे कांदळवन क्षेत्र वनविभागाकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या कांदळवन क्षेत्राची भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी करून ते वनविभागाला वर्ग केले जाणार आहे. यामुळे वनविभागाकडून कांदळवन क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.

वसई, विरारमध्ये खाडी किनाऱ्याला लागून, पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. यातील काही क्षेत्र हे महसूल विभागाकडे आहे. मागील काही वर्षांपासून भूमाफियांमार्फत कांदळवन नष्ट केली जात आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात माती भराव करून त्यावर अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. यामुळे कांदळवन क्षेत्र कमी होऊ लागले आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी वसईच्या महसूल विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत. कांदळवन संवर्धन करण्याच्या दृष्टीने कांदळवन विभागाची जबाबदारी मोठी आहे. याशिवाय कांदळवन हा भाग वनांच्या निगडित आहे. त्यामुळे या कांदळवनांचे क्षेत्र हे वनविभागाकडे वर्ग करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत बैठका व चौकशी प्रगतीपथावर आहेत.

canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

हेही वाचा – भाईंदर : महिला व बाल तक्रार कक्षात ८३ तक्रारींची नोंद, पोलीस आयुक्तालयाच्या उपक्रमास प्रतिसाद

वसई, विरार भागात सुमारे एक हजार २७७ हेक्टर कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत आहे. ते वर्ग करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र वनविभागाने सर्व क्षेत्र आम्हाला मोजणी करून द्यावे असे सांगितल्याने महसूल विभाग भूमिअभिलेखच्या मदतीने सर्वेक्षण करून कांदळवन क्षेत्र वर्ग केले जाईल असे वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी म्हटले आहे. काही वर्षांपासून कांदळवन संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्याच्यामार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवनाचे संवर्धन केले जात आहे. आता जे महसूल विभागाकडे कांदळवन येते ते आता कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्ररित्या लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

१) कांदळवन संवर्धन होण्यास मदत

मागील काही वर्षांपासून कांदळवन संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवन क्षेत्राचे संवर्धन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जे महसूल विभागाकडे कांदळवन येते ते आता कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास त्यावर स्वतंत्ररित्या लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – बेकायदा हॉटेल चालकाकडून मेट्रो खालील जागेवर वाहनतळासाठी कब्जा, मीरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावरील प्रकार

२) कांदळवन अतिक्रमणावर करडी नजर

वसई, विरार भागात कांदळवनांची कत्तल करून अतिक्रमण करण्यात येत होते. हे अतिक्रमण रोखण्यासाठी यंदाच्या वर्षी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कांदळवन अतिक्रमण प्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यात जूचंद्र, ससूनवघर, बापाने, वैतरणा, शिरगाव अशा विविध ठिकाणच्या भागात महसूल विभागाने कारवाई करीत सात गुन्हे दाखल केले आहेत, अशी कारवाईची मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.

“महसूल विभागाच्या अख्यातरित असलेले कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे वर्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी क्षेत्राची मोजणी केली जाणार आहे. याशिवाय कांदळवन समितीची बैठक घेतली जाणार आहे.” – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी, वसई.