नकली पोलीस बनून आलेल्या पाच जणांनी महामार्गावरून जाणार्‍या अंगाडियांना अडवून त्यांच्याकडील साडेपाच कोटींची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अंगाडियाच्या चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या काळबादेवी येथे राहणारे श्रावण ठाकूर (२४) हे अंगाडिया चालक बाबू स्वामी आणि अक्षय ठाकूर हे चारचाकी गाडीने गुजरातला निघाले होते.

हेही वाचा >>> वसई विरार महापालिकेतील ५ उपायुक्तांच्या बदल्या

रात्री ९ च्या सुमारास डोळ्यावर झोप येत असल्याने त्यांनी विरारच्या खानिवडे टोल नाक्याजवळ येऊन गाडी तोंड धुवण्यासाठी थांबवली होती. याच दरम्यान, त्यांच्या मागून आलेल्या एका वाहनातून ५ जण उतरले. त्यांनी आपली ओळख पोलीस असल्याची करून दिली आणि त्यांच्या वाहनात असलेल्या रोकड बाबत चौकशी केली. यानंतर त्यांनी चालक बाबू स्वामी आणि अक्षय ठाकूर यांना आपल्या वाहनात बसवून नेले तर फिर्यादी यांच्या कडील रोकड असलेली बॅग, मोबाईल फोन काढून घेतला. चालक आणि अक्षय ठाकूर याला काही अंतरावर सोडून दिले. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४१९, ३४१ आणि ३४ नुसार तोतयागिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> विरारमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड, वसई-विरार दरम्यान लोकल ट्रेन बंद; प्रवाशांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंगाडियाचा चालकासह ४ जण ताब्यात या प्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अंगाडियाचा चालक बाबू स्वामी याच्यासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती दिल्याचा त्याच्यावर संशय आहे. योजनेनुसार चालकाने गाडी थांबवली आणि तोतया पोलिसांनी येऊन रोकड लुटून नेली असावी असे पोलिसांनी सांगितले.