वसई : अवघ्या २० रुपयांसाठी चावी बनविणार्‍या व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे नाक फोडणार्‍या पोलीस उपनिरीक्षकावर अखेर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजशेखर सलगरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. घटना घडून १० दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.

मोह्ममद अली अहमद अली अन्सारी (३५) यांचे वसईत चावी बनविण्याचे दुकान आहे. १६ मे रोजी अन्सारी यांच्या दुकानात एक इसर चावी बनविण्यासाठी आला होता. दोन चावी बनविण्याचे ८० रुपये झाले होते. मात्र त्याने केवळ ६० रुपये दिले. ठरलेल्या रकमेपैकी २० रुपये कमी दिल्याने अन्सारी आणि त्या ग्राहकात वाद झाला. शेवटी प्रकरण माणिकपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांनी फिर्यादी मोह्मद अन्सारी यांच्या मारहाण केली आणि त्यांच्या नाकावर जोराद ठोसा मारला. त्यामुळे अन्सारी यांचे नाक फ्रॅक्चर झाले होते.

हेही वाचा…ध्रुव राठीची चित्रफीत प्रसारित केल्याने वकिलाविरोधात गुन्हा ; वसईतील घटना

पोलिसांच्या या दादागिरीमुळे संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अन्सारी यांना जबर दुखापत होऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ठाण मांडले. मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांच्या विरोधात ३२५, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…अर्नाळा येथे वाळू उपश्यासाठी निघालेली बोट उलटली, ११ मजूर सुखरूप; एक मजूर अजूनही बेपत्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षुल्लक वादातून ही घटना घडली आहे. आमच्या पोलिसांने मारहाण करणे चुकीचे होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाणयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली असून येत्या २६ जून रोजी पोलिसांना आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.