विरारमध्ये घरात गॅसचा भीषण स्फोट

घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली.

Indonesia banten jail fire 40 prisoners killed
(प्रातिनिधीक छायाचित्र)

आगीत घर जळून खाक

वसई : विरार पूर्वेच्या खार्डी येथे घरात घरगुती गॅसचा भीषण स्फोट होऊन  घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत घर व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

विरार पूर्वेतील खार्डी गावातील रहिवासी भरत मुल्या पाटील यांच्या घरात बुधवारी अचानक गॅसचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या घटनेची माहिती विरारच्या अग्निशमन दलाला देण्यात आली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील पैसे सोने, कपडे, रेशन इतर सर्व वस्तू जळून खाक झाले असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात लागूनच असलेल्या घरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Huge gas explosion in a house in virar the house is on fire akp

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या