वसई : वसई पुर्वेच्या भागात शेलटर हॉटेल जवळ असलेल्या एका इको रिसायकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले. वसई पूर्वेच्या तुंगार फाटा परिसरात इको रिसायकल करणारा कारखाना आहे. या कारखान्यात रिसायकलिंगसाठी ठेवलेल्या प्लास्टिक साहित्याला सोमवारी सायंकाळी अचानकपणे भीषण आग लागली.

हेही वाचा : नालासोपार्‍यातील ४५२ कोटींच्या सांडपाणी प्रकल्पाच्या निविदा अखेर प्रसिद्ध, पालिकेला ठोठावलेला १०० कोटींचा दंड माफ होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. प्लास्टिक साहित्य असल्याने आगीचा भडका उडाला आहे. आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून किंवा कोणी आतमध्ये अडकले नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. यापूर्वी कामणं येथील मिक्सर कारखान्याला आग लागली होती. आठवडाभरातील ही शहरातील दुसरी आग दुर्घटना आहे.