वसई: मत्स्य दुष्काळामुळे चाळीस दिवसांच्या स्वघोषित बंदी नंतर वसईच्या बोटी मासेमारीसाठी निघाल्या होत्या. मात्र आता मासेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात येत असल्याने मच्छीमारांच्या समोर आता आणखी नवे संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी निराशा पदरी घेऊन माघारी परतल्या आहेत.

वसईतील अनेक मच्छीमार बांधव हे समुद्रात व खाडीत मासेमारी करतात. या मासेमारीच्या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र मागील काही वर्षपासून वातावरणातील अनियमितता, चक्री वादळे, समुद्रातील वाढते प्रदूषण अशा विविध प्रकारच्या अडचणीमुळे माशांची आवक घटू लागली आहे. यंदाच्या वर्षी मासेमारीचा  हंगाम सुरू झाल्यापासून मत्स्य दुष्काळाचा सामना मच्छिमार बांधवांना करावा लागत आहे. या निर्माण झालेल्या मत्स्य दुष्काळावर मात करण्यासाठी व मत्स्य प्रजातींची वाढ व्हावी यासाठी वसई, नायगाव, अर्नाळा या भागातील मच्छिमार बांधवांनी चाळीस दिवस स्वघोषित बंदी जाहीर करत आपल्या बोटी बंद ठेवल्या होत्या. या बंदीचा कालावधी संपल्यानंतर आठवडाभरापासून बोटी या समुद्रात मासेमारीसाठी रवाना होऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : अश्लील बेवसिरिज प्रकरण : आणखी ५ तक्रारदार तरुणी समोर, मुख्य आरोपी अटकेत

परंतु आता मच्छीमारांच्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने आणखीन नवे संकट उभे राहिले असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे. जेलिफिशमुळे इतर मत्स्य प्रजाती त्या जागी थांबत नाहीत त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात मच्छी सापडणे कठीण झाले आहे. ज्या भागात सातशे ते आठशे पापलेट व। इतर मासळी सापडत होती त्याठिकाणी यंदा जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेलिफिश आढळून आले आहेत. या जेलीफिशच्या वजनाने जाळ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने मोठा फटका मच्छीमारांना बसला आहे.

हेही वाचा : वसई : उत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांचा गौरव; ‘सिरियल रेपिस्टची अटक’, ‘हत्येचा उलगडा’ ठरला सर्वोत्तम तपास

यावर्षी आमच्या मच्छीमारांच्या मागे एकापाठोपाठ एक अशी संकटे येत आहेत. मत्स्यदुष्काळाची भीषणता अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे. आता शासन स्तरांवरून मच्छीमारांना मदत मिळावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तुळशीदास कोळी, मच्छिमार बांधव नायगाव

पुन्हा पदरी निराशा

चाळीस दिवसानंतर लाखो रुपयांचे इंधन फुकुन व इतर खर्च करीत मैल न मैल प्रवास करून समुद्रात जाळी टाकली होती. परंतु जाळी उचलताच त्यात जेलिफिश आढळून आले. केलेली मेहनत  व खर्च पूर्णतः वाया गेला असून अवघ्या एक ते दोन दिवसात निराशा पदरात घेऊन  पुन्हा एकदा माघारी परतावे लागले आहे.वसई विरार मधील सुमारे शंभर ते सव्वाशे बोटी पुन्हा माघारी आल्या आहेत.