करोना काळात रोजगार गेल्यामुळे कुटुंबांवर स्थलांतराची वेळ
प्रसेनजीत इंगळे
विरार : करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत. त्यांची मुले सोबत असल्यामुळे मोठा वर्ग शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात आहे. पालघर शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी करोना काळात केलेल्या सर्वेक्षणात तीन हजार ८६५ मुले जिल्हा, तालुका, तसेच राज्याबाहेर स्थांतरित झाली आहेत. तर १६७२ मुले इतर जिल्ह्यतून, राज्यातून जिल्ह्यत दाखल झाली आहेत.
टाळेबंदीमुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उभा राहिला. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला सहन करावा लागला. डहाणू तालुक्यातून करोना काळात सर्वाधिक १४७४ मुलांचे स्थलांतर झाले आहे. वसई तालुक्यातून २३७ मुले स्थलांतरित झाली आहेत. यात १९७४ मुले आणि १८९१ मुली तर ४४८ गरजाधिष्टित मुलांचा समावेश आहे. तालुक्याबाहेर गेलेली एकूण १५८१ मुले आहेत. तर जिल्ह्यबाहेर गेलेली एकूण मुले १३७७ आहेत. राज्याबाहेर गेलेली एकूण मुले ९०७ आहेत. याचप्रमाणे जिल्ह्यत इतर विभागातून स्थलांतरित होऊन आलेले विद्यार्थी १६७२ आहेत. तर परजिल्ह्यतून १४१ विद्यार्थी आहेत. तसेच पर राज्यातून ८५ विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आहेत. करोना काळात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांंचे त्यांच्या पालकांबरोबर स्थलांतरण होत आहे. या संदर्भात माहिती देताना पालघर जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे विषय सहायक पालघर डायसचे तानाजी डावरे यांनी माहिती दिली की, विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांंचे स्थलांतरानंतरचे शिक्षण अहवाल विभागाने ठेवले आहेत. मुख्य कारण कोविड जरी असले तरी इतरही काही कारणाने मुलांचे स्थलांतर झाले आहे. एकूण मुले १३७७ आहेत. राज्याबाहेर गेलेली एकूण मुले ९०७ आहेत.
याचप्रमाणे जिल्ह्यत इतर विभागातून स्थलांतरित होऊन आलेले विद्यार्थी १६७२ आहेत. तर परजिल्ह्यतून १४१ विद्यार्थी आहेत. तसेच पर राज्यातून ८५ विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आहेत. करोना काळात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांंचे त्यांच्या पालकांबरोबर स्थलांतर होत आहे. या संदर्भात माहिती देताना पालघर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे विषय सहायक पालघर डायसचे तानाजी डावरे यांनी माहिती दिली की, विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांंचे स्थलांतरानंतरचे शिक्षण अहवाल विभागाने ठेवले आहेत. मुख्य कारण कोविड जरी असले तरी इतरही काही कारणाने मुलांचे स्थलांतर झाले आहे.