वसई – मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या नायगावमधील मेकअप आर्टिस्ट नयना महंत (२९) हिची प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. नयनाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातच्या वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी नयनाचा विवाहित प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याला अटक केली आहे.

नयना महंत (२९) ही तरुणी सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करायची. ती नायगाव पूर्वेच्या सनटेक इमारतीत रहात होती. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात तिच्या बहिणीने तक्रार दाखल केली होती. तपासात नयनाची हत्या तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याने केल्याचे उघड झाले आहे. पाण्यात बुडून तिची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये टाकला होता. ही सुटकेस त्याने गुजरातच्या वलसाड येथे टाकून दिली होती. वलसाड पोलिसांना तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी मनोहर शुल्का याला मंगळवारी सकाळी अटक केली आहे, अशी माहिती सहाय्क पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे यांनी दिली.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त

हेही वाचा – वसईचे शेतकरी ‘किसान’ नाहीत!; महापालिका क्षेत्रामुळे अनेक योजनांपासून वंचित

अशी झाली हत्या उघड

नयना नायगावमध्ये एकटी रहात होती. १२ ऑगस्टपासून तिचा फोन बंद येत असल्याने तिची बहीण जयाने तक्रार दिली होती. ज्या इमारतीत नयना रहात होती, त्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी मनोहर शुक्ला सुटकेस घेऊन जात असलेला दिसला. सोबत त्याची पत्नीदेखील होती. तिलादेखील आरोपी केले जाणार आहे.

हेही वाचा – वसई-विरारला ऑक्टोबरपासून मुबलक पाणी? एमएमआरडीएचे ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

नयना पूर्वी वसईला रहात होती. सिनेसृष्टीत काम करणार्‍या आरोपी मनोहर शुक्लाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले आणि त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळे ही हत्या केली असल्याची शक्यता नायगाव पोलिसांनी व्यक्त केली.