भाईंदर : पावसाची हजेरी लागताच रस्त्यावर निर्माण होणाऱ्या खड्डय़ाच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याकरिता मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करून ते खड्डे भरण्याचे काम करण्यात येते. मात्र जोरात पाऊस आल्यावर पुन्हा खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण परिस्थिती जैसे थे असते. यामुळे प्रशासनाला मोठय़ा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा खड्डय़ाची समस्या उद्भवू नये म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जेट पॅक्चर पोटोल पॅचिंग मशीनह्ण या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रथम खड्डे पडलेल्या ठिकाणी प्रेशर टाकून तो संपूर्ण खड्डा पाणी व हवा मुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम डांबर हे कोल्ड मिक्स बांधकाम साहित्य सामुग्री मिसळून त्यात टाकण्यात येणार आहे. यामुळे हे खड्डे अवघ्या काही कालावधीत भरले जाणार असून त्यानंतर कितीही पाऊस आला तरी ते खराब होण्याची शक्यता फार कमी असते असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित
मीरा भाईंदर शहरातील खड्डे विजवण्याकरिता दरवर्षी पालिकेकडून साधारण तीन कोटी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र तरीदेखील कामाच्या महिन्याभरानंतर परिस्थिती पूर्वीप्रमाणे जैसे थे तशी होते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे विजवण्याचा मार्ग शोधण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती.त्यानुसार यावर्षी जेट पॅक्चर पोटोल पॅचिंग मशीनह्ण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता अर्थसंकल्प ५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून त्याच्या वापराकरिता महासभेपुढे मंजुरी करिता गोषवारा मांडण्यात आला आहे.
यावर्षी शहरात नागरिकांना पावसाळय़ात एकही खड्डा दिसून येणार नाही आहे. शिवाय शहरातील खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे भरता येतील याकडे जातीने लक्ष देण्याच्या सूचना मी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.– दिलीप ढोले, आयुक्त ( मीरा भाईंदर महानगरपालिका )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern technology filling pits roads mira bhayandar cleared potholes coming rains mira bhayander municipal corporation amy
First published on: 04-05-2022 at 00:03 IST