वसई: वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या भागात उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिकेने कारवाई सुरू केली आहे. नुकताच प्रभाग समिती जी मधील भोयदापाडा व ससूनवघर येथील साडेतीन हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त केले आहे.

वसई विरार मध्ये अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या अतिRमण विभागाने पावले उचलली आहेत. एकापाठोपाठ एक अशी बांधकामे तोडली जात आहेत. भोयदापाडा येथे चॅनेल व विटांचे अडीच हजार चौरस फुटांचे उभारलेले अनधिकृत बांधकाम व ससूनवघर येथील एक हजार चौरस फूट असे एकूण साडेतीन हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. तर नायगाव येथे ही फेरीवाल्यांनी अतिRमण करून विविध दुकाने थाटली होती ती दुकाने ही तोडण्यात आली आहेत. तर विरार कुंभारपाडा येथेही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी दिली आहे.