विरार : वसई विरार पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी बुधवारी गोखीवरे येथील कचराभूमीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच शहरात स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
पालिका क्षेत्रात दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावली जावी तसेच अनेक काळापासून प्रक्रियेविना पडून असलेल्या कचऱ्याची पाहणी त्यांनी यावेळी केली. काही काळापासून पडून असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच ही प्रक्रिया नव्या आधुनिक यंत्रणाचा वापर करून पर्यावरणपूरक करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणावर भर शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यामुळे आता स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत बाबत पालिकेकडून कार्यवाही केली जात असून यामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होणार आहे.