वसई:  गुरचरण जागेत करण्यात येत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी वसईच्या महसूल विभागाने अतिक्रमण धारकांना नोटिसा काढल्या आहेत.आतापर्यंत जवळपास २ हजार २०० नोटसा दिल्या आहेत. वसई, विरार शहरातील बहुतांश गुरचरण जागा या भूमाफियांनी अतिक्रमण करून त्या गिळंकृत केल्या आहेत. स्वत:च्या आर्थिक लाभासाठी चाळी, व्यावसायिक गाळे, टपऱ्या इतर अतिक्रमण केले जात आहेत. हे अतिक्रमण निष्काशीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्याच अनुषंगाने वसईच्या महसूल विभागाने ही कंबर कसली असून ज्या ज्या भागात अतिक्रमण झाले आहे त्यांना नोटिसा काढण्यास सुरुवात केली आहे.

वसईतील सुमारे १७२ हेक्टर गुरचरण जागेत अतिRमण झाले आहे. वसई, निर्मळ, मांडवी, आगाशी, माणिकपूर, विरार या सहा मंडळ विभागात ६ हजार ५०८ इतकी निवासी, औद्योगिक, व्यावसायिक  बांधकामे ही गुरचरण जागेत आहेत. ही बांधकामे तोडून गुरचरण जागा मोकळ्या केल्या जात आहेत. आतापर्यंत वसईच्या तहसीलदार विभागाकडून २ हजार २०० जणांना अतिक्रमण धारकांना  नोटिसा दिल्या असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

गुरचरण जागेतील अतिक्रमण हटविले

 ससुनवघर तलाठी सजे अंतर्गत येणाऱ्या चिंचोटी येथील लाईन पाडय़ा शेजारी, स.नं.२८/अ मध्ये काही भुमाफियांनी गुरचरण जागेत अनधिकृत बांधकाम ससुनवघर तलाठी  संतोष शिर्सेकर व मंडळ अधिकारी कुमार होगाडे यांनी व त्यांच्या पथकाने हे बांधकाम तोडले आहे.  तसेच नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडम सव्‍‌र्हे क्रमांक २६ क या जागेतील ही अनधिकृत बांधकामावर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली आहे.