वसई : जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनानाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे किनारपट्टी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागिरका मिळून १३ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. या मोहीमत एकूण ५१ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. या कचर्‍यातील ६५० किलो प्लास्टिक चा स्वयंचलिक यंत्राद्वारे पुर्नवापर करण्यात आला.

२१ सप्टेंबह हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त वसई विरार महाापालिकेने राजोडी आणि कळंब समुद्रकिनार्‍यावर व्यापक स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे माजी महापौर राजीव पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी समुद्रकिनार्‍यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला.

हे ही वाचा…वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार

या मोहिमेत १३ हजारांहून अधिक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस विद्यार्थी, अग्निशमन जवान, विविध सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक, बचत गटाच्या महिला, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक आदींनी सहभाग घेतला होता.या मोहिमेसाठी महापालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार राजोडी ते कळंब या अडीच किलोमीटरच्या पट्ट्याती २० भाग तयार करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी, नागरिकांना तो परिसर विभागून देण्यात आला होता. त्यानुसार स्वच्छता करण्यात आली.

हे ही वाचा…वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी ‘गो शून्य’ या संस्थेने स्वयंचलित यंत्राद्वारे टाकाऊ प्लास्टीकचा पुनर्वापर करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्लास्टीक पासून विविध वापरण्याजोग्या गृहोपयोगी वस्तू बनविण्यात येणार आहेत.या मोहीमेत पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरीत कऱण्यात आली.