वसई: वसई, विरार शहरात पालिकेने करोनाच्या संकटकाळात उभारण्यात आलेले प्राणवायू ( ऑक्सिजन) प्रकल्प सध्या बंद आहेत. ते प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी स्वारस्य अभिरुची तत्त्वावर चालविण्यास देण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. करोनाच्या संकट काळात वसई, विरार शहरात करोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची अधिक गरज भासली होती.परंतु सुरवातीला पालिकेचे प्रकल्प नसल्याने प्राणवायूची टंचाई निर्माण झाली होती.
करोनाचे संकट व भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याच दृष्टीने शासनाकडून जिल्हास्तरावर प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर वसई-विरार महापालिकेने ही प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे निष्टिद्धr(१५५)त करून चार ठिकाणी पालिकेने प्राणवायू प्रकल्प उभारले होते.
यामध्ये चंदनसार, बोळींज, सोपारा, वसई वरूण इंडस्ट्री यांचा समावेश आहे. या चारही प्राणवायू प्रकल्पांची ६३ मॅट्रिक टन इतकी क्षमता आहे.करोनाच्या संकट काळात या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना प्राणवायू पुरवठा करण्यास मोठी मदत झाली होती.मात्र सध्या स्थितीत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्राणवायूची मागणी कमी झाली आहे. सद्य्स्थितीत पालिकेचे चारही प्राणवायू प्रकल्प हे बंद अवस्थेत पडून आहेत. जास्त काळ जर हे प्रकल्प पडून राहिले तर त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.
यासाठी आता पालिकेने या प्राणवायू प्रकल्प स्वारस्य अभिरुची या तत्वावर चालविण्यास देण्याचा विचार सुरू करण्यात आला आहे. यासाठी पालिकेकडून स्वारस्य अभिरुची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी सांगितले आहे. असे झाल्यास हे प्रकल्प सुरळीत ही राहतील व त्याची देखभाल ही होण्यास मदत होईल असे बगाडे यांनी सांगितले आहे.
दुरवस्था होण्याची भीती
प्राणवायू प्रकल्प बंद अवस्थेत पडून असल्याने ही यंत्रणा बंद पडून त्याची दुरवस्था होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केलेला खर्च ही वाया जाऊ शकतो यासाठी पालिकेने बंद असलेले प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
प्राणवायू (ऑक्सिजन) प्रकल्पासाठी स्वारस्य अभिरुची निविदा काढण्याचा पालिकेचा विचार आहे. त्याच दृष्टीने आता प्रय सुरू केले आहेत. जेणेकरून ते प्रकल्प सुस्थितीत सुरू राहतील.
-अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त महापालिका.