पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

वसई: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी एक कॅमेरा शहरासाठी लावण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योजकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.  जनतेच्या सुरक्षेसाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणे आवश्यक असते. मात्र पोलिसांना सर्वत्र कॅमेरे लावणे शक्य नसल्याने त्यांनी नागरिकांना कॅमेरे लावण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी एक कॅमेरा शहरासाठी ही  मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, प्रवेशद्वार अशा विविध ठिकाणी  लोकसहभागातून  सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने विविध सामाजिक संघटना पुढे येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 वसई नवघर इंडस्ट्री असोसिएशन यांच्या तर्फे देखील औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात १७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुक्त संजय पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. औद्योगिक वसाहतीतील गुन्ह्य़ांना त्यामुळे आळा बसेल. औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटना घडतात त्यांचा शोध घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने वसई तालुका इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यात औद्योगिक वसाहतींना जोडणारे सर्व रस्ते सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले आहेत, अशी माहिती वसई तालुका इंडस्ट्री असोसिएशनचे सहसचिव प्रशांत बागल यांनी दिली.  उमराळे येथील मराडी ग्रामस्थांनी आपल्या गावकुसावर गावातील प्रमुख तिन्ही सार्वजनिक रस्त्यावर पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उमराळा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर अनिल गोन्साल्विस यांच्या शुभहस्ते या सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.  वसई-विरार व मीरा भाईंदर शहरात लोकसहभागातून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.