scorecardresearch

दफनभूमीचा प्रश्न सुटला; विरारमधील म्हाडाच्या जागेवर प्रशस्त दफनभूमी

question cemetery solved Spacious cemetery MHADA Virar Municipality amy 95

वसई : मागील ३० वर्षांपासून रखडलेला वसई- विरार शहरातील मुस्लीमधर्मीयांच्या दफनभूमीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पालिकेने विरार पश्चिम येथील म्हाडाच्या जागेवर प्रशस्त दफनभूमी तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. तर वसईतील सनसिटी येथे सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहे.
वसईमध्ये एकही शासकीय दफनभूमी नसल्याने मुस्लीम बाधवांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठय़ा अडचणी येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे खासगी दफनभूमीची जागा अपुरी पडू लागली आहे. यापूर्वी वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात वसई पश्चिमेच्या मालोंडे येथे भूमी आरक्षण क्रमांक ६८५, वसईतील दिवाणमान येथे ५९४अ/ इपी ६९, उमेळमान येथे ७३९, गोखिवरे येथे इपी ८८, विरार येथे १३७/ इपी ९३ तर नारंगी येथे २०४ हे भूखंड मुस्लीम दफनभूमीसाठी आरक्षित केले होते. पण विविध तांत्रिक कारणांमुळे या जागांवर दफनभूमी तयार होऊ शकली नव्हती. वसई- विरारमधील मुस्लीमधर्मीय मागील ३० वर्षांपासून दफनभूमीच्या जागेची मागणी करत होते. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने करम्ण्यात येत होती.
राज्य शासनाने विरारमधील भूमापन क्रमांक (सव्‍‌र्हे नंबर) ३७६ मध्ये एकर जागा दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेचा ताबा २०११ मध्ये वसई- विरार महापालिकेकडे दिला होता. या जागेचा विकास करून ती जागा दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र पालिकेने या दफनभूमीच्या जागेवर महापालिका मुख्यालयाल बांधायचे ठरवले. त्यामुळे पुन्हा दफनभूमीचा प्रश्न चिघळला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विरार पश्चिमेला असणाऱ्या म्हाडाच्या भूखंडावर मुस्लीमधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्यास संमती दिली आहे. म्हाडा येथील जागा हस्तांतरित झाली असून या जागेवर दफनभूमी तयार करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. अंतिम मंजुरीसाठी तो राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांनी दिली.
विरार पश्चिमेला बोळींज येथे म्हाडाच्या जागेवर मुस्लीमधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही राज्याच्या प्रधान सचिवांना सादर केला आहे. या ठिकाणी मुस्लीमधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्यात येणार आहे.

  • वाय. एस. रेड्डी, संचालक, नगररचना विभाग, वसई-विरार महापालिका
    सनसिटी येथे सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याच्या मार्गातील सर्व अडथळे यापूर्वीच दूर झाले आहे. कामाच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पुढील पाच महिन्यांत हे काम पुर्ण केले जाणार आहे
  • राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका वसईतील दफनभूमीसाठी निविदा प्रसिद्ध
  • वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. वसईच्या सनसिटी येथे ११ एकर जागा आरक्षित केली होती. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा पालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने २०१३ मध्ये या जागेवर माती भराव करून भिंत बांधली होती. मात्र या दफनभूमीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला होता.
  • दरम्यान, पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हरित लवादाने बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून या दफनभूमीचे काम रखडले होते. त्यानंतर पुन्हा पालिकेने या कामासाठी परवानगी मिळविण्याचे काम सुरू केले होते. यात पालिकेला महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण आणि पाणथळ विभागाच्या परवानग्या मिळाल्या होत्या.
  • सुमारे दोन कोटींच्या कामाची निविदा आम्ही काढली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून आम्ही दफनभूमीसाठी लढा देत होतो. त्याला यश आले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात हा सुखद निर्णय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया बसीन तालुका मुस्लीम कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष अॅिड. खलील शेख यांनी दिल

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Question cemetery solved spacious cemetery mhada virar municipality amy

ताज्या बातम्या